गँगस्टर सुरेश पुजारीवर 50 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल

सूरेश पुजारीला (Suresh Pujari)नुकतीच फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर हा पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला आहे.

गँगस्टर सुरेश पुजारीवर 50 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल
sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कुख्यात गुंड सुरेश पुजारीविरोधात (Suresh Pujari) मुंबईत सांताक्रुझ ( Santa Cruz) येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागितल्याप्रकरणी सुरेश पुजारीवर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत उत्तर-पश्चिम मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी असलेल्या 51 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. सूरेश पुजारीला (Suresh Pujari)नुकतीच फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर हा पहिला गुन्हा मुंबईत दाखल झाला आहे.

फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या एका मित्राला साथीदाराला गेल्या मार्च महिन्यात पुजारीकडून खंडणीच्या धमक्या आल्या होत्या. 50 लाख रुपये न दिल्यास गुंडाने रेस्टॉरेंट मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गुन्हा गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


गँगस्टर सुरेश पुजारीवर 50 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल
अनिल देशमुखांचे बॅास कोण ? बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच..

पुजारीच्या अटकेच्या बातम्या तक्रारदार हॉटेल व्यावसायिकाने पाहिल्यानंतर त्याने याप्रकरणी पुढे येऊन पुजारीने आपल्यालाही 50 लाखांची खंडणीसाठी धमकावल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी कलम ३८७, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला वर्ग करण्यात आले आहे.

पुजारी फिलीपिन्समध्ये २० सप्टेंबरपासून वास्तव्याला होता. भारतीय यंत्रणा आता सुरेश पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पूर्वी सुरेश पुजारी पूर्वी गँगस्टर रवी पुजारीसोबत मिळून काम करत होता. त्यानंतर सुरेश पुजारीने रवी पुजारीपासून दूर होत. स्वतःची टोळी बनवली. २०१८ मध्ये मुंबई व ठाण्यातील सुमारे २५ व्यावसायिकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी टोळीच्या वतीने धमकावण्यात आले होते.

पुजारी २००७ मध्ये पुजारी देश सोडून पळाला होता. तेव्हापासून तो परदेशातून व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. १०जानेवारी , २०१८ मध्ये भिवंडीतील एका हॉटेलमध्ये खंडणीच्या वादातून गोळीबार झाला होता. गोळीबारात तेथील स्वागत कक्षातील महिला कर्मचारी जखमी झाली होती. या गोळीबारानंतर खंडणीच्या यादीत असलेल्या मुंबई व ठाण्यातील सर्व व्यावसायिकांना पुजारीने पुन्हा दूरध्वनी करून यावेळी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत आधी मागितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रकमेची मागणी केली होती.

तो 14 वर्षांपासून फरार होता. 2015 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुजारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि नंतर रवी पुजारी टोळीशी निगडीत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com