
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागले आहे. सामना सुरु असतानाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र केसरीचा गतविजेता शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ पाहावयास मिळाला.
आगामी काळात होत असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होत आहे. यामध्ये चिराग पासवान यांना दिल्ली निवडणुकीत भाजप विजयी होईल, अशी आशा वाटत आहे.
पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवर आपले मत मांडायचे. आता असे कुणी दिसत नाही. कोणतेही सरकार असले तरी साहित्यिकांनी मार्ग दाखवायला हवा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. चांगले काय वाईट काय हे सांगावे. जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील, तेव्हा त्यांची पुस्तकेही वाचायला घेतील, असेही ते म्हणाले.
पुण्यात विश्व मराठी साहित्य संमेलनाचा समारोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. तसेच अभिनेत्यांना पुरस्कार मिळतात, आम्हाला तिरस्कार मिळतो, असे मिश्कील विधानही त्यांनी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची आज सभा झाली. यावेळी त्यांनी दिल्लीतील महिलांसाठी मोठी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा होण्यास सुरूवात होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पुणे महापालिकेकडून शहरात कचरा करणाऱ्यांकडून ६० लाख रुपये वसूल केले आहेत. शहरात अनेक नागरिकांकडून कुठेही कचरा फेकून दिला जातो. अशा लोकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नवी मुंबईतील नेते रमाकांत म्हात्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंची भेट घेतली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शहरातील ताकद वाढणार आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून ऑपरेशन टायगर सारखे राजकीय प्रयोग केले जात आहेत. अशातच शिंदे यांच्या शिवसेना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर राजकीय भूकंप काय असतो ते दाखवून देवू असे वक्तव्य केलं आहे. तर त्यांनी हा इशारा कोणाला दिला असून नेमका रोख कोणाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. कदम यांनी, तटकरे यांच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांचे काम केलं नाही, असा दावा केला आहे. तर लोकसभा आणि विधानसभेवेळी नेमकं काय झालं याची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. काहीच तासांच्यानंतर येथे मतदार आपला हक्क बजावणार आहे. याआधी आज सुपर संडे पाहायला मिळत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपसह काँग्रेसवर निशाना साधला आहे. मोदींनी, नेहरूजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर 12 लाखांच्या उत्पन्नावर सरकारने तुमच्या पगाराचा एक चतुर्थांश हिस्सा घेतला असता. तर आज इंदिराजी असत्या तर त्यांनी 12 लाखांवर उत्पन्नावर 10 लाखांचा कर लावला असता असे म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही, असे खळबळजनक वक्तव्य केलं होते. यामुळे ते सध्या जोरदार चर्चेत आहेत. यातच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी, काँग्रेससोबत युती केली त्याच दिवशी आदित्य ठाकरे इंग्रजी बोलायला लागले, असा टोला लगावला आहे.
राज्यात शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून कोल्हापूरमध्ये तो रद्द करण्यात आला आहे. तर सांगलीत शेतकऱ्यांनी आपला विरोध सुरू ठेवला आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही. फक्त मुठभर लोक याला विरोध कर आहेत. याबाबत सर्व आमदारांशी चर्चा झाली असून त्यांनी कोणाचाही विरोध नसल्याचे म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये शनिवारी (ता.1) झालेल्या चकमकीच्या घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. बिजापूर जिल्ह्यातील तोडका कोरचोली चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आलं होतं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेत मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेतली. तसेच ते 100 टक्के गुन्हेगार नाहीत, याची खात्री असल्याचे म्हटले होते. यावरून मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी, महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले. पण ते जाता जाता जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले, अशी टीका केली आहे.
पंढरपुरात आज विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरात देवाचा शाही विवाह सोहळा झाला.
मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय, मुलगी वैभवी यांनी आज भगवानगडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खून व खंडणी प्रकरणातील सर्व पुरावे नामदेवशास्त्री यांना सुपूर्द केले. नामदेवशास्त्री यांनी काहीच दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांना गडाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.
जो धर्माच्या सोबत राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरोधात राहील, त्याचं काही खरं नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे, असं विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. त्याच्यात मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. काही लोक ठरवून आणि सुपारी घेऊन आरोप करतात, काहीही बोलतात. कशातही आपलं नाव ओढतात, अशी खंत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजे १६००० कोटी रुपयांची बिले थकीत आहेत, त्यामुळे राज्यातील शासकीय ठेकेदार देशोधडीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी अनेक कामे मंजूर करून आणली. मात्र, त्या कामाचे पैसे अजूनही देण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारने ठेकेदारांचे सर्व पैसे तातडीने द्यावेत, अन्यथा शासकीय ठेकेदार हे येत्या १४ फेब्रुवारीपासून संपावर जातील, असा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे शीतयुद्ध नाही, असे विधान भारतीय जनता पक्षाचे मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. तसेच मी ठाण्यात जनता दरबार घेणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा. मी चार कामे करेन, अजितदादांच्या मंत्र्यांकडून चार कामे होतील आणि एकनाथ शिंदेंचा मंत्रीही चार काम करेल, त्यामुळे जनतेची बारा कामे होतील, असाही दावा मंत्री नाईक यांनी केला आहे.
बीडमधील (BEED) मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब महंत नामदेवशास्त्री महाराज यांची भेट घेणार आहे. यासाठी ते भगवान गडाकडे शिष्टमंडळासह रवाना झाले आहेत. महंत नामदेवशास्त्री महाराज यांच्याकडे न्यायाची मागणी करणार आहे. या भेटीत काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे (Nagpur) रवाना झाली आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून 19 जुलै 2024 भारतात आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. आतापर्यंत 4 लाख 30 हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे दर्शन घेतले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) केलेल्या विधानामुळे अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ‘Poor Lady’, असे विधान केल्यामुळे सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भंडारा येथील जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या सभापतीपदासाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. चार सभापती पदांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. दोघांकडूनही सभापतीपदे मिळविण्यासाठी तयारी सुरू झाल्याचे दिसते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, तिथं हदगावमधील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक उपस्थित झाले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु आहे, त्यांच्यात विसंवाद वाढत आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं. शनिवारी सादर झालेले बजेट हे जनतेला मधाचं बोट लावण्याचा प्रकार आहे. निवडणुका समोर ठेवून मोदी सरकारने बजेट सादर केले आहे, बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजायला 72 तास लागतात, असा टोला राऊतांनी लगावला.
नाशिक-गुजरात हायवेवर खासगी बसचा आज आज पहाटे अपघात झाला. यात सात जणांना मृत्यू झाला आहे. सुमारे 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत्यू झालेले आणि जखमी व्यक्ती हे गुजरातचे रहिवासी आहेत. ते नाशिक येथे देवदर्शन करुन परत गुजरातला जात होते. खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातात इतका भीषण होता. ती बसचे दोन तुकडे झाले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परभणीच्या प्रशासनाने रद्द केले आहेत. आणखी 127 रद्द होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत . श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे .
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, अशी टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. त्यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याकी 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर आणखी 127 रद्द होणार आहेत.
शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मोकाटे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
महंत नामदेव शास्त्रींनी आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. अशातच आता त्यांना हत्या प्रकरणातील दुसरी बाजू माहिती नसल्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला असावा, असंही बोललं जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मस्साजोगचे ग्रामस्थ नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी भगवान गडावर जाणार असून यावेळी ते या प्रकरणातील महत्वाचे पुरावे देखील दाखवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.