
बावनकुळे म्हणाले, राहूल गांधी यांनी कामठी विधानसभेतून निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे मी त्यांच्या विरोधात लढण्यास तयार आहे. त्यांनी आजाच २०२९मध्ये होणाऱ्या विधानसभेत माझ्या विरोधात लढण्याचे आजच जाहीर करावे.
दिल्लीच्या लोकांनी मला कधीच निराश केलं नाही. लोकसभेच्या 2014, 2019 आणि 2014 अशी तीनही निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी भाजपला सातच्या सातही जागा दिल्या. मात्र, देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आणि दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात एक खंत होती. दिल्लीची पूर्णपणे सेवा करता येत नाही हीच ती खंत होती. पण आता दिल्लीने आमचा तो आग्रहसुध्दा मान्य केला,असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर मोठी घोषणा केली.ते म्हणाले, दिल्लीला आधुनिक शहर बनवणार आहे. यमुना नदीला दिल्लीची ओळख बनवणार असल्याचीही मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली. हे काम कितीही कठीण असलं तरी संकल्प मजबूत असेल तरी हे कामही पूर्ण होणारच असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिल्लीकरांना दिलं.
राजकारणात खोटारड्यांना जागा नाही.आज अहंकार, अराजकता आणि 'आप'दा चा पराभव केला. एनडीए म्हणजे विकास आणि सुशासनची गॅरंटी असल्याचं विधानही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
भाजपचं डबल इंजिन सरकार दिल्लीचा विकास करणार आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपनं अनेक कल्याणकारी योजना आणल्या. दिल्लीच्या विकासासमोरील अडथळा दिल्लीकरांनी दूर केल्याचंही मोदी यांनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील विजयानंतर भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केलं.ते म्हणाले,दि्ल्लीत विकास विश्वासाचा दिल्लीत विजय झाल्याचं मोदी म्हणाले. दिल्लीकरांनी कधीच भाजपला निराश केलं नाही. हरियाणा,महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत नवा इतिहास लिहिला गेल्याचं म्हणत या निवडणुतील विजयाचं वर्णन केलं.दिल्लीकरांनी दिल्लीचं मालक बनू पाहणार्यांना घरी बसवलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी..नड्डा यांनी आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. यावेळी त्यांनी केजरीवालांचा उल्लेख कट्टर बेईमान नेता आणि आम आदमी पक्षाला खोटं बोलणार्यांची पार्टी संबोधत डिवचलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिल्लीतील विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिला. तसंच दिल्लीकरांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभारही मानले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपनं आपचा धुव्वा उडवताना 48 जागा जिंकल्या. तर आपला अवघ्या 22 जागा जिंकता आल्या. या दणदणीत विजयानंतर भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्री राम, मोदी - मोदी घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान मोदी संबोधन करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या भाजप-शिवसेना यांच्यातील फॉर्म्युल्यावर भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद मागितलं होतं. पण अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. उलट मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर शनिवारी मतमोजणी करण्यात येत आहे. दरम्यान, आपचा पराभव होताच नायब राज्यपालांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. दिल्लीतील सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केला आहे. यामध्ये सरकारी डेटा आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सचिवालय पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील जनतेने पीएम मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. येत्या काळात भाजप दिल्लीकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील. राहुल गांधी यांना पराभवाची कल्पना होती त्यामुळेच त्यांनी काल टीका केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आजच्या निकालाने केजरीवालांचा बुरखा फाटला असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शर्डी येथील साईबाबांच्या ते हिंदू की मुस्लीम? या वादाच्या विषयात वादग्रस्त कालीचरण महाराज आपले मत व्यक्त करत साईबाबा हे हिंदूच होते, सर्व हिंदूंनी त्यांची भक्ती करावी, असे आवाहन केले आहे. हिंदू संस्कार आणि परंपरेत साईबाबांचा जन्म झाला, त्यामुळे कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नका, असे कालीचरण महाराज म्हणतात.
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे कालीचरण महाराज यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह ज्या महापुरुषांनी हिंदूंच्या रक्षणासाठी काम केले, त्यांचा अपमान करणाऱ्यांची मुंडकी छाटा, असे खळबळजनक विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटके संदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर कालीचरण यांचे हे वक्तव्य आले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला. अमित शाह यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, असा दावा ठाकरे यांनी केला होता. त्यावर सहा वर्षांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती, पण अमित शाह यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर मीच ठाकरेंना उपमुख्यमंत्री पदाची आॅफर दिली होती, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
विदर्भात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विदर्भ उपक्रमाची सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतील या उपक्रमात मोठे उद्योग गडचिरोलीत येणार आहेत. यावेळी जेएसडब्ल्यू गडचिरोलीत भारतातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारणार असल्याची घोषणा चेअरमन सज्जन जिंदाल यांनी घोषणा केलीय.
सध्या एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता याच भेटीवेळी मंत्री गिरीष महाजनही तेथे असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर महाजन यांनी, माझी आधीच मुख्यमंत्री साहेबांसोबत अकरा वाजताची वेळ होती. त्याप्रमाणे मी गेलो असे सांगितले असून, खडसे साहेब म्हणजे राष्ट्रीय नेते. ते खालच्या लोकांना का विचारतील? आणि माझी का भेट का घेतील? मी लहान आहे, असे म्हटलं आहे
दिल्लीत भाजप सत्तेत येणार असून आता जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 28 जागांवर पुढे आहे. एकीकडे भाजपने मोठी मुसंडी मारल्याने कार्यकर्ते जल्लोष करत आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांनी कार्यकर्त्यांना थोडासा संयम बाळगा, असे आवाहन केले आहे.
दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री नितेश राणे यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत, राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीचा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या विश्वासाचा विजय आहे. काल दिल्लीत तीन माकडं बसून ईव्हीएम वर बोलत होती ही माकड आज कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. खासदार राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेवर नितेश राणे यांनी निशाना साधला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.
शेतकरी-कष्टकरी यांना नरेंद्र मोदीजींचे दिल्लीतील सरकार सातत्याने त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. विरोधकांनी कितीही नरेटीव सेट केले तरी देशाच भविष्य आता भारतीय जनता पार्टी आहे. भाजप सर्व सामान्य जनतेच्या हिताने काम करणारा पक्ष असून दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपला यश मिळाल आहे.
दिल्लीचे निकाल लागण्यास आता सुरूवात झाली असून आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप 45 जागांवर आघाडीवर असून भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. यानंतर आता आम आदमी पार्टीची सत्ता गेल्यात जमा असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपच्या पराभवाचे मुख्य कारण सांगितले आहे. केजरीवालांचा पराभव मद्य घोटाळ्यानेच केला. दारुला हात लावल्याने आपचा घात झाला असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
दिल्लीतील विधानसभा निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी, दिल्लीच्या निवडणुकीतही भाजपने महाराष्ट्र पॅटर्न राबवला असून मागील 5 वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात सगळी ताकद दिल्याचा आरोप केला आहे. सध्याच्या घडीला भाजप 42 जागांवर आघाडी असून आम आदमी पक्षाला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसची पाटी कोरीच आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी टीका केली आहे. काँग्रेसचा हा रडका डाव आहे. पराभव झाला की ईव्हीएमला दोष द्यायचा. कोणावर तरी खापर फोडायची, कोणाला तरी बदनाम करायची, ही काँग्रेसची रणनीती असल्याचे राम शिंदे म्हणाले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (SDMA) पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्राधिकरणामध्ये नऊ सदस्य असून मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत. प्राधिकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश नाही.
राजन साळवी या क्षणापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबर असल्याचा दावा करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. दहा तारखेचा दहा वाजून दहा मिनिटांनी पाहू, असेही राऊत यांनी म्हटले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणीत गेल्या दोन तासांपासून पिछाडीवर असलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता आघाडीवर आले आहे. त्यांना 254 मतांची आघाडी मिळाली आहे. मनीष सिसोदिया यांनी देखील आघाडी घेतली आहे.
साईबाबा संस्थानच्या भोजनालयात भाविकांव्यतिरिक्त इतरांना मोफत जेवण बंद केल्यानंतरच्या गुरुवारी भोजनार्थींच्या संख्येत जवळपास दहा हजारांची घट झाल्याचे आढळले. गुरुवारी मोफत भोजन प्रसादाची 38 हजार 500 भाविकांनी टोकन वाटप केली. ज्यापैकी 24 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तर, सशुल्क पासद्वारे 4 हजार जणांनी प्रसादाचा लाभ घेतला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्राथमिक कलांनुसार भाजपने जोरदार मुसंडी घेतली असून, 42 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी कायम ठेवल्यास दिल्लीत भाजपचा 1993 नंतर मुख्यमंत्री होईल. तब्बल 27 वर्षांनंतर भाजपचा दिल्लीच्या तख्तावर मुख्यमंत्री बसू शकतो.
काँग्रेसच्या अलका लांबा आणि संदीप दीक्षित पिछाडीवर आहेत. बादली या एकमेव मतदारसंघातून काँग्रेस आघाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेतली असून, भाजपने कलांनुसार 41 जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्ष 27 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडी घेतली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, भाजपने ३१ जागांवर आघाडीवर आहे. आपचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्याचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे दिल्लीत सत्ता कोणाची याचा फैसला आज होणार आहे.
पुण्यातील GBS रूग्णांची संख्या 180 वर पोहचली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात जीबीएसचे रूग्ण वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे जीबीएसचा आजार फोफावत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.