Maharashtra Political News Live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जालन्यात दाखवले काळे झेंडे

Sarkarnama Headlines Live Updates : राज्य आणि महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

एकनाथ शिंदेंना जालन्या दाखवले काळे झेंडे

विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रूपये हप्ता देण्याची घोषणा करूनही सरकारने अद्याप हा हप्ता दिला नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप करत शहरातील मंठा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक आहे - जयंत पाटील

बदलापूरच्या प्रकरणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा एन्काऊंटर फेक आहे, कोणाला तर संरक्षण द्यायचे होते? कोणाला तर रॉबिन हुड बनायचं होत? कोणाला तर नाव कमावयाच होत? कदाचित तो अनेक गोष्टींचा साक्षीदार असेल म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला असेल, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला

Padma Awards 2025 : विलास डांगरेंना, मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विलास डांगरे, मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विलास डांगरे हे होमोपॅथिक चिकित्सक आहेत. तर चैत्राम पवार हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर, मारुती चितमपल्ली हे वन्यजीव अभ्यासक असून त्यांनी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार केले आहे. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. 

Bajrang Sonawane : 27 तारखेला बरच काही दडलेल बाहेर काढणार

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड याला आयसीयूमध्ये शिफ्ट केले. त्यांना नेमका आजार झालाय काय? ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळते त्याच दिवशी कसे दुखते, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच २७ तारखेला पत्रकार परिषद घेऊन बरच काही दडलेल बाहेर काढणार,असे म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माईंड सापडला पाहिजे, असे देखील सोनवणे म्हणाले.

Amit Shah : आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करतो: अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचे ठराव पत्र भाग-3 जारी केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपसाठी ठराव पत्र हा विश्वासाचा प्रश्न आहे. ही पोकळ आश्वासने नाहीत. आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करतो. दिल्लीचा अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवून भाजपचे ठराव पत्र तयार करण्यात आले आहे.

Eknath Shinde : सभेपूर्वी प्रगतशील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात जालन्यातील देवमुर्ती येथील श्री दत्त आश्रम संस्थानला भेट देणार आहेत. जालना शहरातील आझाद मैदानावर सायंकाळी साडे सहा वाजता एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. सभेपूर्वी एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यातील डॉक्टर, वकील आणि प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या पोलिसांवर 'आका'चा दबाव होता का? : सुरेश धस

अख्या महाराष्ट्रात संतोषाची लाट निर्माण करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून आता राजकारण तापलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे निघत आहेत. आज मुंबईत आक्रोश मोर्चाचे वादळ धडकले असून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी, बीडच्या पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं करत. पोलिसांवर 'आका'चा दबाव होता का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे : सुरेश धस

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यामागणीसाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. आज मुंबईत देखील आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह भाजपचे आमदार सुरेश धस यात सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अशी मागणी केली आहे.

Ajit Pawar News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण 

राज्यात महायुतीचे सरकार आल्यास कर्जमाफी करू असे आश्वासन भाजपने दिले होते. पण अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नाही असे वक्तव्य केल्यानंतर एकच टीकेची झोड उठली होती. यानंतर शनिवारी (ता. 25) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर मी असे वक्तव्य केलं नसून आम्ही देखील शेतकरी आहोत. शेतकऱ्याला मदत देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

Explosion at Company in Bhandara News : भंडाऱ्यातील स्फोटानंतर ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह कंपनीबाहेर ठेवत केला निषेध

भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावरून सध्या ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी मृतदेह कंपनीबाहेर ठेवत निषेध केला आहे. तर कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर ग्रमस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक यांनी केला.

Kolhapur News Update : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुन्हा एल्गार

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापुरच्या हद्द वाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी कोल्हापूर हद्दवाड कृती समितीने लढा उभारण्याची निर्धार केला असून रखडलेल्या हद्दवाढीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Mumbai News : मुंबईच्या गोरेगावमधील चित्रपटाच्या शूटिंगसेटला भीषण आग

मुंबईच्या गोरेगाव येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी उभारण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत गोदाम आणि फर्निचरचे दुकान आले असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Sharad Pawar News Update : शरद पवारांचा हिंगोली जिल्हा दौरा अचानक रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 27 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जनशताब्दी निमित्त दौरा नियोजत होता. मात्र आता अचानक प्रकृती बिघडामुळे रद्द करण्यात आला आहे.

Maharashtra Live Update : खासदार संजय राऊत यांचा आज नाशिक दौरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचा विधानसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच दौरा आहे. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमधील गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन ही करणार आहेत.

Panaji News : गोव्यात सावंत सरकारची सुमार कामगिरी? विरोधक आक्रमक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारची सुमार कामगिरी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर आता विरोधक आक्रमक झाले असून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती निश्चित केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या विधानसभा संकुलातील कक्षात यासाठी विरोधी आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला आलेमाव यांच्यासह गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता, कार्लुस आल्मेदा, ‘आप’चे वेन्झी व्हिएगस उपस्थित होते.

Nashik News Update : साईबाबा मंदिर परिसरातील अब्दुल बाबा समाधीचा वाद पुन्हा पेटणार

शिर्डी येथील साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी परिसरात असणाऱ्या समाधीवरून आता वाद सुरू झाला आहे. येथील अब्दुल बाबा समाधीवरून वाद पुन्हा पेटण्याची शक्यता असून समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा सध्या करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्षेप घेतला आहे.

YSR Congress : विजयसाई रेड्डी यांनी खासदारकीचा राजीनामा

वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजयसाई रेड्डी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. रेड्डी यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्तीही जाहीर केली आहे. आगामी काळात आपण कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, तो कोणाच्याही दबावातून घेतलेला नाही, असेही विजयसाई रेड्डी यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar : एसटीच्या ताफ्यात नवीन बस येणार : अजित पवार

एसटीच्या ताफ्यात नवीन बस येणार आहेत, त्याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर विचार सुरू आहे. तसा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने घेतला जातो, त्यानुसार तो घेतला जाईल. जनतेला त्रास कसा होणार नाही आणि एसटी महामंडळ कसं चालेल, असा मध्यमार्ग काढला जाईल.

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं : जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. याशिवाय इतरही प्रमुख सहा मागण्या केल्या आहेत.

Santosh Deshmukh Murder Case : मुंबईत जन आक्रोश मोर्चाला सुरुवात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून देशमुख कुटुंबीय हे मोर्चात सहभागी झाले आहेत.

Walmik Karad : वाल्मीक कराडची सिटी स्कॅन तपासणी; डॉक्टरांकडे अहवाल सादर

वाल्मीक कराड याची सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल डॉक्टरांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉ. एसी. बी. राऊत यांनी ही माहिती दिली आहे. कराड याच्या पोटदुखीवर उपचार सुरू आहेत. वाल्मीक कराड याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

Ajit Pawar : 'जीबीएस' आजाराच्या प्रादुर्भावावरील उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार; DCM अजित पवार यांची माहिती

पुणे (Pune) महापालिकेच्या हद्दीत प्रादुर्भाव वाढत असलेले 'जीबीएस' आजाराबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली. या आजाराला जास्त खर्च होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी अजित पवार यांना दिले आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ती उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन गावकऱ्यांना अजित पवार यांनी दिले.

Ajit Pawar And Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार अन् खासदार सुप्रिया सुळे एका व्यासपीठावर येणार

Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule On Ajit PawarSarkarnama

इंदापूर येथील न्यायालयाच्या (Court) इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. इंदापुरामध्ये तालुकास्तरीय दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात वरिष्ठ सत्र न्यायालयाची मंजुरी मिळाल्यामुळे त्याच्या उद्घाटनासाठी हे एकत्र येणार आहेत.

26/11 Mumbai Attack : मुंबई 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

मुंबई 26/11 हल्ल्यातील दोषी मास्टरमाईंड तहव्वूर राणा याच्या वकिलाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे. तहव्वूर राणा हा मुळचा पाकिस्तानचा असल्याचे सांगितले जात आहे. तो सध्या कॅनडाचा नागरीक आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष"

राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.

Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून दिली धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Narendra Chapalgaonkar : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन

जेष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. साहित्यिक आणि वैचारिक लेखन करणारे लेखक, व्याख्याते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सर्किट हाऊस येथे आता ते दाखल झाले आहेत. आजच्या दौऱ्यात ते विविध अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. तसेच अनेक स्थानिक आमदार पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवारांच्या भेटीसाठी येणार आहेत.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा मैदानात

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं यासह इतर मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर 8 मागण्यासाठी ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com