
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी करूणा शर्मा या उपोषणाला बसणार आहेत.त्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत.शर्मा यांनी मुंडेंच्या राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.इतके घोटाळे करून सुद्धा माणूस मंत्रिमंडळात राहतो कसा? त्याला कोण वाचवतोय? असा खडा सवालही करूणा शर्मा यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे.सगळ्यांनी पक्षाकडून दिलेले कामे करा.शाखेनुसार काम करा.विधानसभा निवडणुकीत जो अनुभव आला, तो लक्षात घेता, जी चूक झाली ती आता होणार नाही,याची काळजी घेण्याचं आवाहन असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे केलं आहे.उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की, मी आता धक्कापुरुष झालोय.कोण किती धक्के देतंय ते पाहूयात. आपण असा धक्का देऊ या, पुन्हा हे दिसता कामा नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले असतानाच आता भाजप आमदार सुरेश धस यांनीही सनसनाटी आरोप केला आहे. त्यात त्यांनी तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी कृषी विभागातील कृषी सहायक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड झाली आहे. 20 हजार रुपयांपासून ते तब्बल 1 कोटीपर्यंत 'रेट कार्ड' च आमदार धस यांनी वाचून दाखवलं.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ते राजीनामा देत नसल्याचे जाहीर टीका केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केल आहे, जर जनतेला वाटत असेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तर त्यांनी द्यायला पाहिजे होता. पण धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस आहे. तो पैशाच्या जीवावर राजकारण करतो.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटात तुफान हाणामारी झाली. घरगुती वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती. न्यायालयाबाहेर झालेल्या हाणामारीत महिला देखील एकमेकांना भिडल्या. पोलिसांसमोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली.
मंत्री धनंजय मुंडे ‘बेल्स पाल्सी’ आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे या साठी शुभेच्छा. असे ट्विट केले आहे.
शपथ घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली सचिवालयात पोहोचल्या. जिथे त्यांनी औपचारिकपणे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आणि भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर तातडीने सुनावणी झाली. या सुनावणीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला. एका तरुणाने डब्यातील तीन प्रवाशांवर अचानक चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.
ही राजकीय केस होती. गेल्या 28 वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होता. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती. त्याचा निकाल 30 वर्षानंतर आज लागलेला आहे. निकाल अजून मी वाचलेला नाही. कायद्याने जे करता येईल ते करणार, हायकोर्टात जाणार असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची दीड वर्षापुर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. मुंडे यांच्या पत्नीने पोलीसात धाव घेतल्यानंतर आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाने राजकीय वातावरण तापलेले असताना या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक अनिल चोरमले यांनी सुत्रे हाती घेत परळीतील पन्नास जणांची झाडाझडती सुरू केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल गोरेगाव पोलिसांना आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या या मेलमध्ये शिंदे यांची गाडी बाॅम्बने उडवून देणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईती आठ ते दहा पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे समृद्धी महामार्गावर मुंबईहून अकोला येथे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे.
दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय वैरातून आपल्याविरोधात तक्रार करण्यात आली होती, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण ३० वर्षांपूर्वीचे आहे. शिक्षेविरोधात मी अपील करणार आहे. कोर्टाचा निकाल नीट वाचल्यानंतर त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान कोकाटे यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने आता त्यांच्याकडून निकालाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये जामीन मिळवण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना अटक होऊ शकते. तसेच त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकीही जाईल.
नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकीही अडचणीत आली आहे. कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची पद रद्द होते. त्यामुळे आता कोकाटेंची आमदारकी जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. वरच्या कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास कोकाटेंची आमदारकी रद्द होईल.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. १९९५ मधील कागदपत्रे फेरफार प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी धरत दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनील कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आल्याने मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार केली होती.
बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 900 कोटीच्या सिडको प्रकल्पाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. साबणे यांनी फडणवीसांना पत्र देखील लिहिलं आहे. या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती.
मंत्री धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विना परवानगी आणणे, बैठकीसमोर न आलेल्या विषयाला मान्यता मिळाली म्हणून टेंडर काढणे, असे अनेक प्रकार केल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपामुळे मंत्री मुंडे अडचणीत आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी मताधिक्य मनोज जरांगेंमुळे घटल्याचे म्हटले आहे. मला माहिती नाही मॉक पोल काय आहे ते, काय करायचं ते करा, मी ते वर्तमानपत्रात वाचलं आहे. मला जर 'ईव्हीएम'चा फायदा मिळाला असता, तर मी दीड दोन लाख मतांनी निवडून आलो असतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या हॉटेल वेस्टीन या ठिकाणी पश्चिम विभागाच्या परिषदेची सत्ताविसाव्या बैठकीला भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उपस्थिती राहणार आहे. जनसेवा बँकेच्या हीरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमास हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृह या ठिकाणी शाह यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच बालेवाडी येथे महाआवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमात ते सहभागी होतील.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळून सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवता येत नाही, हे या सरकारचे दुर्दैव आहे. जावई निवडताना चोखंदळपणा दाखवता तोच लोकप्रतिनिधी निवडताना दाखवला पाहिजे, असं राजू शेट्टी म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. या ऑपरेशन टायगरची सर्वात जास्त झळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला बसली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा सुरू असून, त्याची जबाबदारी शिवसेनेतील 12 मंत्र्यांवर असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात आज सकाळी भुकंपाचे धक्के जाणवले, काही ठिकाणी जमिनीला तडे गेले. कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते
छत्रपती संभाजी नगर येथे विविध मागण्यांसाठी परिचारिकांचे आंदोलन सुरु आहे, दरमहा २६ हजार मानधन द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांनी काम बंद आंदोलनास प्रारंभ केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली आहे. त्यांचा शपथविधी आज रामलीला मैदानावर होणार आहे. सकाळी अकरा वाजता शपथविधी सोहळ्यास सुरवात हौणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता या मुख्यमंत्रीपदी पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डी आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.