

संभाजीनगर: उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लागले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्र्यांवर मुलीला महापौर करायचं होतं अशी टीका केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी जंजाळ यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा त्यांच्याकडं मोठा पदभार अशी उपरोधात्मक टीका केली होती. त्याच टिकेवरून युवा सेनेचे पदाधिकारी राजेंद्र जंजाळ यांचे समर्थक आदित्य दहिवाल यांच्याकडून पालकमंत्र्यांना डीवचण्यासाठी हे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत.
चंद्रपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला बाजुला सारुन ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौराला पाठिंबा दिला. यासाठी प्रत्येक नगरसेवकानं १ कोटी रुपये घेतले असा खळबळजनक आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
आमची भूमिका ठरवणारे भाजपा कोण ? गरज भासले की,म्हणायचे,हे आमचेच आहेत,पण आमची भूमिका आम्ही ठरवू,असा इशारा,शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला दिला आहे,सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांकडून शिवसेना शिंदे पक्षाला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्यात दावा करण्यात आला,यावरून मंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपाला इशारा देत सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणासोबत जायचं,त्याबाबत नूतन सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून ठरवलं जाईल,त्याबाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात येईल आणि अंतिम आदेशानंतरच सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकं कोणाबरोबर जायचं असं देखील शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या वादाचे पडसाद नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात उमटले. आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक काही नगरसेवकांनी बाहेर जा, तुमची गरज नाही, असे उद्गार काढल्याने दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे काही काळ महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
खान आणि बाण याचे राजकारण सोडून आता परभणी शहराच्या विकासासाठी काम करायचे आहे परभणी शहराच्या विकासासाठी सर्व 65 नगरसेवकांना सोबत घेणार आहोत आणि परभणी शहरांमध्ये सर्वात मोठी समस्या ही कचऱ्याची आहे ती कचऱ्याची समस्या आम्ही मार्गी लावणार आहोत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला परभणीचा विकास करायचा आहे असे सांगितले असल्याची माहिती परभणीचे महापौर सय्यद इगबाल यांनी दिली आहे.
धाराशीव जिल्ह्यात 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास संबंधित कंपनी टाळाटाळ करत होत्या. याविरोधात जिल्ह्यात मोठे आंदोलन झाले. विशेषतः खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील या जोडीने शेतकऱ्यांना पीकविम्याची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाही दिला. अखेर पाच या लढ्याला यश आले असून पीकविम्याचे 134 कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे.
चंद्रपूर महापौर पदग्रहण समारंभात भाजपमधील गटबाजी उफाळून आली असून मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महापौर संगीता खांडेकर यांनी स्वीकारला पदभार. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच जोरगेवार यांच्या गटातील सतरा नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी 11 महिने काम करत होते, परंतू शिक्षण विभागाच लक्ष नसल्याने तालुक्यातील 157 युवा प्रशिक्षणार्थी मागील 5 महिन्यांपासून विद्यावेतनाशिवाय असून पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या 5 महिन्यांपासून हजेरी अपलोड अद्यावत झालेली नाही.
157 पैकी 30 टक्के प्रशिक्षणार्थी यांच्या हजेरी अपलोड झाल्यात तर उर्वरित प्रक्षणार्थींकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्यानं हजेरी अपलोड झालेली नाही. त्यामुळे विद्यावेतन न मिळणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
चंद्रपूर महापौर पदग्रहण कार्यक्रमात चंद्रपुर भाजपमधील अंतर्गत कलह गटबाजी उफाळून आल्याचे पहायला मिळाले.. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महापौर संगीता खांडेकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला.
परंतू या पदग्रहण समारंभाला भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करीत, आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील सतरा नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद संवाद साधणार आहेत. पुढील आठवड्यापासून सुनेत्रा पवार पक्षातील प्रत्येक आमदाराशी व्यक्तीगत संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर महत्वाची चर्चा होण्याची शक्याता.
पक्ष संघटन मजबुतीसाठी, तसेच आमदाराच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार बैठक असं बोललं जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता सक्रीय झाल्याचे पहायला मिळतं आहे.
भारत-अमेरिका नव्या व्यापारी कराराविरोधात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. सिटू संघटनेच्या वतीने आज देशभरात संप पुकारला आहे.
शेतमजूर युनियन, किसान सभा आणि अनेक कामगार संघटना यामध्ये सहभागी आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे..
अमेरिकन शेतमालासाठी आपल्या बाजारपेठा खुल्या केल्यातर देशातील शेती व्यवस्था बाजार संकटात येईल, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
आज जर भगतसिंग असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कोश्यारी यांनी पहिलं नाव बदलावं असा सल्लाही त्यांनी दिला. कालच्या कोश्यारींच्या वक्तव्यावरून मनसे नेते भडकल्याचे दिसून आले. कोश्यारींनी नाशिकमध्ये बोलता बोलता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटीवरून निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना कोश्यारींनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यावर आज मनसे स्टाईलने प्रतिक्रिया देण्यात आल्याचे दिसून आले.
चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकाला एक एक कोटी दिले आहे, असा गंभीर आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवण्यात आली की त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठराव दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची एक प्रत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, असे दौंड राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्या पत्रकार परिषदेत अजितदादांसोबत कुठे चर्चा झाली, काय चर्चा झाली होती, याची माहिती देणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या गेली एक तासापासून चर्चा आहे. शिवसेनेने चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. मनसेने कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या भूमिकेबाबत राज ठाकरेंकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रोहित पवार यांनी माझं नाव कुठं घेतलं ते सांगा. म्हणजे मला उत्तर देता येईल. अजित पवार यांच्या भेटीची माझी नियोजित वेळ ही पाच वाजताची होती. मी पाच वाजून दहा मिनिटांनी पोचलो. पावणेसात ते सातपर्यंत मी माझी भेट संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस दादा पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि मी रायगडच्या दौऱ्यावर होतो, असे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली होती. जागा वाटपाच्या वेळी अजितदादा म्हणाले होते की, अरे फार ताणाताणी करू नका. लवकरच आपण एकत्र होणार आहोत. बारा फेब्रुवारी रोजी ते होणार होतं. जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर त्याबाबतची घोषणा होणार होती. पण दुर्दैवाने अजितदादांचा मृत्यू झाला. जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात विलिनीकरणाची तारीख ठरली होती. आज दादा आपल्यात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा झाली असती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुश काकडे यांनी सांगितले.
अमेरिकेतील टेक्सास शहरात मोठी खळबळ उडाली आहे. टेक्सासमधील एल पासो विमानतळावर मेक्सिकन ड्रग्स कार्टेलच्या ड्रोनच्या ताफ्याने घुसखोरी केल्यामुळे विमानतळ अचानक बंद करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ 10 दिवस बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे ठप्प झाली आहेत.
पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरु झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत आहेत त्याही ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. दुपारी मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा आढावा VC द्वारे घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार ,जिल्हाधिकारी दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व महत्त्वाचे अधिकारी असणार उपस्थित राहतील.
आपल्या स्वार्थासाठी आपली चामडी वाचवण्यासाठी जे भारतमातेला ट्रम्पकडे गाहाण ठेवतात ते सरकार काहीही करु शकतं. आता पर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्षपणे झाला नाही. उलट तो पक्षपातीच झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्याने क्लीनचीट देण्यात आली. जे भ्रष्ट लोक भाजपत गेले त्यांना क्लीनचीट देण्यात आली. घात-अपघात इतर अनेक प्रसंगात तपासयंत्रणांनी भाडकाऊपणा केला. देशातील तपास यंत्रणा लाचार, गुलाम झाल्या असा हल्लाबोल संजय राऊत यांना केला.
राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या प्रवास सवलत योजनेमुळे परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक आधार मिळालाय. मागील 35 महिन्यांत राज्य सरकारने महिलांच्या सवलतीच्या प्रवासासाठी तब्बल 5 हजार 80 कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. एसटी बस प्रवासात महिलांना 50 टक्के तिकिट सवलत दिल्यामुळे बसमधील प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढलीय. या योजनेमुळे महिलांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली असून महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ झालीय. त्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्यास मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्याने परिवहन विभागाने 15 फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सुमारे 25 लाख वाहनांपैकी 10.70 लाखांनी नोंदणी केली असून 8.68 लाख वाहनांना प्लेट बसविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अधिक निधीची मागणी राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्याकडून जनता दरबारचा आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची देखील खांडोळी करण्याच्या हालचाली महायुतीच्या गोटामध्ये सुरू आहेत. सर्वच कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी महायुतीच्या नेत्यांची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 23 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा घेतल्या असल्या तरी प्रथमतः राष्ट्रवादीला अध्यक्ष पद त्यानंतर भाजप आणि शिवसेनेला अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला आता देशभरातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवड केली जाणार आहे. काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे चा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.