Ajit Pawar Funeral Live Updates : अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला, थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार

Ajit Pawar Baramati Plane Crash Live Updates : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार. अंत्यसंस्कारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार.
Ajit Pawar Funeral Live
Ajit Pawar Funeral LiveSarkarnama

Goa CM Dr Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत दाखल झाले आहेत.

Ajit Pawar Funeral Live Updates: अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला

अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला, थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार

Ajit Pawar Funeral Live Updates: काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना

काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना. पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणलं जाणार.

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख काटेवाडीत पोहोचले

अजित पवारांच्या अंतिम संस्कारासाठी अभिनेता रितेश देशमुख काटेवाडीत पोहोचले

Ajit Pawar Funeral Live Updates: अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार

अजित पवारांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा न काढता ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेलं जाणार आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल झाले आहेत.

Sharad Pawar: शरद पवार काटेवाडीतील निवासस्थानी दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव सध्या काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं आहे. तर आता शरद पवार देखील काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Ajit Pawar Funeral Live Updates: अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेलं जाणार

पुढील अर्धा तासाच्या आत अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेलं जाणार आहे. ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार आहे. अंत्यसंस्काराचे सगळे विधी मैदानात संपन्न होणार असून यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात येईल त्यानंतर अजित दादा यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल.

Ajit Pawar Funeral Live Updates: अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काटेवाडीतील निवासस्थानी हजारो नागरिकांची गर्दी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुळगाव असलेल्या काटेवाडी येथे अजित पवारांचे पार्थिव नागरिकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवलं आहे. शिवाय सध्या संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल झाले आहेत. तर अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काटेवाडीतील निवासस्थानी हजारो नागरिकांनी केली आहे.

Ajit Pawar Funeral Live Updates: बारामती विमानतळावर पोलिसांसह NDRF चे पथक दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी देशभरातली अनेक दिग्गज नेते बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी  बारामती विमानतळावर पोलिसांचं पथक आणि NDRF पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

Vidip Dilip Jadhav : अजितदादांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव या  त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ajit Pawar Funeral Live : अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी दाखल करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com