
Khamgaon Crime News: पुरोगामी महाराष्ट्र नक्की काय चाललंय असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची क्रुरपणे झालेली हत्या, हे प्रकरण ताजे असताना लोकप्रतिनिधींवरील हल्ल्याचं सत्र अद्याप थांबलेलं दिसत नाही. खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
खामगाव जवळ असलेल्या सुटाळातील सरपंच निलेश देशमुख यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शुल्लक कारणावरुन देशमुख यांच्यावर लोखंडी रॅाडने हल्ला झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.या हल्ल्यातून ते थोडक्यात बजावले आहेत.
देशमुख यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह
सरपंच देशमुख आणि त्यांचे मित्र हे एका हॉटेलमध्ये भोजन करण्यासाठी बसलेले होते. तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिनमध्ये भोजन करायला बसलेले होते.हॉटेलमध्ये थुंकण्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोन्ही गटात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली. काही कालावधीनंतर देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.