Congress Politics : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटलांचा नकार, ओबीसी फायरब्रँड नेत्याला मिळणार संधी?

Congress state president Satej Patil amit Deshmukh : निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही.
 Satej Patil amit Deshmukh
Satej Patil amit Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

दीपा कदम

Congress Politics : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. निवडणुकीत नीचांकी जागांवर घसरलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. यामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर होते.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी ते उत्सुक होते. मात्र, नाना पटोले पदावर कायम राहिले. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांना सूचना करण्यात आली मात्र त्यांनी आपली असमर्थता दर्शवली.

सतेज पाटील यांच्यानंतर आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रदेशाध्यपदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनीही प्रदेशाध्यक्षपद इतक्यात नको, अशी भूमिका घेत हात वर केले आहेत. देशमुख आणि पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या इच्छुक नसल्याचे पक्षप्रश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविल्याचे खात्रीदालयक माहिती आहे.

 Satej Patil amit Deshmukh
Mahayuti News: शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंगाचा दोर फडणवीसांकडे; शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये चलबिचल

ओबीस नेत्यांवर नजर

दोन नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिल्यानंतर तिसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या यशोमती ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे.

पटोलेंच्या राजीनाम्यावर निर्णय नाही

लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी नवीन प्रदेशाध्यक्ष निश्चित करणे आवश्यक असल्याने काँग्रेस नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात आहे. त्यासाठी त्यांनी सतेज पाटील यांना प्राधान्याने विचारले असल्याचे समजते.

प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार का?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की राज्यात सत्ता नसताना संघटनेची जबाबदारी संभाळणे आव्हानात्मक असते. शिवाय आर्थिक जबाबदारी देखील असते. पक्षाचा दर महिन्याचा खर्च हा 30 लाख रुपयांच्या आसपास असतो. दिल्लीकडून रसद न मिळाल्यास प्रदेशाध्यक्षाला या खर्च करावा लागतो. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असल्याने प्रदेशाध्यक्षासमोर मोठे आव्हान असेल.

 Satej Patil amit Deshmukh
Local Body Elections : कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेत महाआघाडी एकत्रच लढणार? काँग्रेस ठरणार मोठा भाऊ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com