Maharashtra Politics : सतीश भोसले उर्फ खोक्या याला पोलीसांनी प्रयागराज येथून अटक करून बीडमध्ये आणल्यानंतर सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, वन विभागाने भोसले याच्या घरावर बुलडोजर चालवून कारवाई केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, करुणा मुंडे आणि सतीश भोसले यांचा एक फोटो समोर आल्यानंतर एकच गदारोळ सुरू झाला आहे. यावर करुणा मुंडे यांनी 'हो खोक्या भाऊ मला एकदा भेटला होता', अशी कबुली दिली आहे.
गहिणीनाथ गडावर दर्शनाला जाण्यासाठी जेव्हा मला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी रोखले होते. (Beed News) तेव्हा सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ ने मला ताई तुम्हाला दर्शनाला जायचे असेल तर मी तुमचा भाऊ म्हणून सोबत येतो आणि तुम्हाला घेऊन जातो, अस मला म्हणाला होता. पण माझ्यामुळे परिस्थिती चिघळणार असेल, तणाव निर्माण होणार असेल तर मी जाणार नाही, अशी भूमिका आपण त्यावेळी घेतली होती.
तेव्हा एकदाच ते ही रस्त्यावर झालेल्या भेटीवरून कोणी माझे नाव त्यांच्याशी जोडत असेल तर ते चुकीचे आहे, असेही करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या पद्धतीने सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊच्या घरावर बुलडोजर चालवला, तशीच कारवाई संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर का करत नाही? वाल्मीक कराड आणि इतर आरोपींच्या घरावरही असाच बुलडोजर फिरवा, अशी मागणीही करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी माध्यमाशी बोलतांना केली.
आज बीडच्या परळी न्यायालयात धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत शपथ पत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावेळी न्यायालयात हजर होण्यापूर्वी त्यांनी खोक्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले.
मी गहिनीनाथ गडावर दर्शनाला जात असताना मला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अडवले. गडावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा खोक्या भोसले मला तिथे भेटला होता. भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत येतो, तुम्हाला गहिनीनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी जाता येईल, असे त्याने मला सांगितले होते.
पण माझ्यामुळे याठिकाणी वाद नको असे म्हणत मी पुढे जाण्याचा निर्णय रद्द केला होता. तेवढीच त्याची आणि माझी ओळख आहे. तिथला एक फोटो देखील आता व्हायरल होत आहे. मात्र माझे सीडीआर, लोकेशन सगळे पोलिसांनी तपासावे त्यांना कुठेही काही दिसणार नाही, असेही करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.