Free School Bag : पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना आता दप्तरही मिळणार; सरकारकडून १६५ कोटींची तरतूद

Maharashtra Free School Bag for students: विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यासाठी सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याकरीता 65 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत.
Maharashtra Free School Bag for students
Maharashtra Free School Bag for studentsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Free School Bag for students News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याची चित्र आहे. अनेक ठिकाणी सरकारी शाळा बंद होत आहेत. तर काही ठिकाणी दोन शाळांचे एकत्रिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता आणि शाळा बंद होऊ नये यासाठीही प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अशा शाळांमध्ये मुलांना आकर्षिक करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन देण्यात येते आता मोफत दप्तरही देण्यात येणार आहे.  नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यातील सरकारी शाळातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यासाठी सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याकरीता 65 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळामध्ये ही योजना राबवली जाते. किंवा काही विद्यार्थ्यांना दप्तरासाठी सरकारी निधी दिला जातो. अशा शाळांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. हा निर्णय Right of Children to Free and Compulsory Education Act 2009 तसेच National Education Policy 2020 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे

Maharashtra Free School Bag for students
Ajit Pawar News: ‘अजितदादा... आय लव्ह यू!’ ... खूप मिस करतोय..मिटकरींचं व्हॅलेंटाईन पत्र

सरकारकडून देण्यात येणाऱ्या शालेय साहित्याच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी येत असतात. आता या योजनेत मिळणाऱ्या दप्तरांचा दर्जा कसा असेल, याबाबतही पालकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. हलक्या दर्जाच्या दप्तरांचा पुरवठा करण्यात येऊ नये, अशी मागणी पालकवर्गांकडून करण्यात येत आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 फेब्रुवारी रोजी याबाबतचा आदेश (जीआर) काढला आहे.

  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा 2009 तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि आनंददायी शैक्षणिक उपक्रमातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • या योजनेतंर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दप्तर पुरवण्यात येईल. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षापासून मोफत दप्तर देण्यात येईल.

  • राज्यातील 41 लाख 43 हजार 54 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शिक्षण संचालकांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावानुसार, 165 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com