४ ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार: वर्षा गायकवाड

राज्यातील कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने मुख्यंमंत्र्यानी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Schools
Schools Sarkarnama
Published on
Updated on

येत्या ४ ऑक्टोबरपासून (4th october) राज्यातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने मुख्यंमंत्र्यानी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पण रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्यात येणार आहेत. राज्यातील बहुतांश भागातील शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच लसीकरण झालं आहे. मात्र टास्कफोर्सच्या नियमावली नुसाारच शाळा सुरु होतील असही वर्षा गायकवाड यांनी म्हटल आहे.

Schools
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जयंत पाटलांकडून दिलासा

शाळा सुरु करण्याबाबत काय म्हणाल्या वर्षा गायकवाड

- ग्रामीण भागात ५ ते १२ चे वर्ग सुरु होणार

- शहरी भागात ८वी ते १२ चे वर्ग सुरु होणार.

- टास्क फोर्सच्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु केल्या जातील

- शाळेत कोणत्याही खेळांना परवानगी नाही

- विद्यार्थ्यांची उपस्थिती महत्त्वाची नाही, पण पालकांची संमती गरजेची असेल.

- पालक म्हणाले होते शाळा सुरु करा, पण विद्यार्थ्यासाठी पोषक वातावरण गरजेच होत.

- ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.

-विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,ताप, पोटदुखी असेल तर पालकांना,शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील..

- विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे,मास्क,याबाबत सूचना दिल्या जातील.

- विद्यार्थ्यांच्या आरोग्याची,सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल

- शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस घ्यावे हे SOP मध्ये आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com