

Surupsingh Naik Death incident : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या संबंधातील अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, अनुभव आणि किस्से आजही अनेकांच्या मनात जिवंत आहेत. निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक प्रसंग नाईक यांच्या साधेपणा आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा आहे.
महेश झगडे नाशिकचे जिल्हाधिकारी असताना सुरूपसिंग नाईक काही काळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळची एक आठवण झगडे यांनी ट्विटवर शेअर केली आहे. यात ते म्हणतात,
मी नाशिकचा जिल्हाधिकारी असताना काही काळ ते नाशिकचे पालकमंत्री होते. एके दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला — “तातडीने गेस्ट हाऊसला या.” काही अतिमहत्त्वाचे काम असावे, असे वाटून ड्रायव्हर येण्याची वाट न पाहता मी स्वतःच गाडी चालवत तिथे पोहोचलो. ते आधीच त्यांच्या गाडीत बसले होते आणि त्यांनी मला देखील गाडीत बसण्यास सांगितले. नेमके काय घडले आहे, हे मला काहीच कळत नव्हते.
गाडी निघाली. इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू असतानाच गाडी थांबली. मंत्री उतरले, म्हणून मीही उतरलो. ते एका अतिशय लहानशा रेस्टॉरंटमध्ये गेले; मीही त्यांच्या मागोमाग गेलो. मला वाटले की या रेस्टॉरंटची काहीतरी तक्रार असावी, म्हणून ते मला इथे घेऊन आले असावेत. पण ते तिथे निवांत बसले आणि मलाही बसण्यास सांगितले. मला काहीच समजेना.
ते एका अतिशय छोट्या हॉटेलमध्ये गेले. आत फक्त मोजकीच टेबलं होती. झगडेंना क्षणभर वाटले की या ठिकाणाबाबत काही तक्रार असावी किंवा पाहणीसाठीच इथे आणले असावे. पण तसे काहीच झाले नाही. नाईक अगदी निवांत बसले आणि झगडेंनाही बसण्यास सांगितले. लगेचच त्यांनी इडली मागवल्या.
मग त्यांनी आमच्यासाठी इडल्या मागवल्या. त्यादरम्यान मीच विचारले, “काय काम आहे?” ते अगदी सहजपणे म्हणाले, “काम काहीच नाही. येथील इडल्या अतिशय छान असतात, म्हणून आपण इथे आलो आहोत.”' ते रेस्टॉरंट इतके लहान होते की जेमतेम तीन-चार टेबल्स असावीत, आणि तिथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी एकत्र बसून इडलीचा नाश्ता करत होते!
ज्यांनी हे दृश्य पाहिले असेल, त्यांचा यावर विश्वास बसणे कठीणच असणार. हा किस्सा सुरूपसिंग नाईक यांच्या स्वभावाचे खरे प्रतिबिंब आहे. जमिनीशी जोडलेले, मनमोकळे आणि माणुसकी जपणारे नेते म्हणून ते कायम लक्षात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात नाईक यांच्या आठवणींना महेश झगडे यांनी उजाळा दिला आहे. नाईक यांच्या साधेपणाच्या अशा अनेक आठवणी सांगितल्या जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.