Shahapur School: शहापूर शाळेत मुलींना विवस्त्र केले! महिला आयोगाकडून दखल; शाळेवर कारवाईचा बडगा

Rupali Chakankar on Shahapur School Menstruation Abuse Case: "मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी," असा आदेश चाकणकर यांनी दिला आहे.
Rupali Chakankar News
Rupali Chakankar NewsSarkarnama
Published on
Updated on

3 महत्वाचे मुद्दे

  1. शहापूर शाळेत धक्कादायक प्रकार: ठाणे जिल्ह्यातील शाळेत मुलींच्या शौचालयात रक्ताचे डाग आढळल्यावर, मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवून तपासणी करण्यात आली, ज्यामुळे राज्यभर संताप उसळला.

  2. रूपाली चाकणकर यांची कारवाई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शाळेला भेट देत पालकांशी संवाद साधला, समुपदेशनाची व शाळा तातडीने सुरू करण्याची सूचना दिली आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

  3. पोलीस व शिक्षण विभागाची पावले: आतापर्यंत ८ जणांवर गुन्हा दाखल, ५ अटकेत असून शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी पर्यायी शाळा सुरू करण्यात आली आहे

Thane News: ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर मासिक पाळी आल्याचं तपासण्यासाठी विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित शाळेला भेट दिली असून पालकांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले आहे.

"मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी," असा आदेश चाकणकर यांनी दिला आहे. याप्रकरणी तपास जलद गतीने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पोलिसांकडून या घटनेचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान या शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाला याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारपासून पर्यायी शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी आत्तापर्यंत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक केली आहे. त्यांना मंगळावार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य 3 जणांची पोलीस चौकशी करीत आहेत. दोन विश्वस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्य दोन विश्वस्त यांनाही आरोपी करण्याची मागणी करत पालकांनी या आधी घडलेल्या काही घटना सांगितल्या आहेत.

Rupali Chakankar News
Abhijit Patil: शरद पवारांच्या आमदाराला मागितली 1 कोटींची खंडणी; कारखान्याची बदनामी करणाऱ्या नेत्याला 10 लाख घेताना अटक

शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली. मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची अपमानजनक पद्धतीने शारीरिक तपासणी केल्याचा आरोप आहे. शाळेच्या बाथरुममध्ये रक्ताचे डाग आणि भिंतींवर रक्ताचे ठसे आढळल्याने मासिक पाळीच्या संशयावरून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर शाळेच्या मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 ४ प्रश्न व एका ओळीतील उत्तरं (FAQs)

प्र.१. शहापूरच्या शाळेत नक्की काय घडलं?
उ.. मासिक पाळीची शंका आल्याने विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवून तपासणी करण्यात आली.

प्र.२. रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात काय भूमिका घेतली?
उ.. त्यांनी समुपदेशन, तातडीने शाळा सुरू करणे आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

प्र.३. किती आरोपींना अटक करण्यात आली आहे?
उ.. ८ जणांवर गुन्हा दाखल असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

प्र.४. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार का?
उ.. नाही, सोमवारपासून पर्यायी शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com