Sharad Pawar : 'पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही'; मयत सूर्यवंशी कुटुंबियांच्या न्यायासाठी पवारांचा 'मोठा' निर्णय

Sharad Pawar Somnath Suryavanshi police custody Parbhani : शरद पवार यांनी परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मयत सोमनाथ यांची आई, भावांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
Sharad Pawar 1
Sharad Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी परभणी इथं पोलिस कोठडीत असताना मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांनी शरद पवार यांच्यासमोर टाहो फोडला.

"साहेब, माझ्या मुलाचा मर्डर झाला असून सर्व दोषींना फाशी द्या, अशी मागणी मयत सोमनाथच्या आईने केली. यावर शरद पवार यांनी पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही, दोषींवर कठोर कारवाईसाठी सरकारकडे जाईल", असे सांगितले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बीडमधील मस्साजोग गावचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. त्यानंतर ते परभणी इथं येत पोलिस कोठडीत असताना मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शरद पवार यांच्याबरोबर यावेळी त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी होते. शरद पवार यांच्या या दोन्ही दौऱ्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला.

Sharad Pawar 1
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांनी पुढची राजकीय दिशा ठरवली; म्हणाले, 'मी काँग्रेसचा...'

शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबियांच्या भावना समजावून घेतल्या. मयत सोमनाथ यांच्या आईने मुलाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले नाही. चार दिवस तो पोलिस (Police) कोठडीत होतो. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. हा मर्डर असून, त्याला पोलिसच जबाबदार आहेत. त्यामुळे त्या दिवशी पोलिस ठाण्यात कामावर असलेल्या सर्व दहा ते पंधरा जणांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरुन फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली.

Sharad Pawar 1
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : अर्बन नक्षलवादाच्या आरोपावर संजय राऊत CM फडणवीसांवर कडाडले; म्हणाले, "हे तुम्ही कोण..."

सोमनाथ मृतदेहावर मारहाणीच्या खुणा

मयत सोमनाथ यांच्या लहान भावाने देखील पवारसाहेबांसमोर बाजू मांडली. भावाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणीनंतर आम्हाला त्याचे पार्थिव देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मृतदेहावर एकही कापड नव्हते. त्यांना कोणाताही आजार नव्हता. पोलिस कोठडीत त्यांना मारहाण झाली. वेगळ्या कोठडीत नेऊन त्यांना मारहाण झाली. त्यांच्या मृतदेहावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. जे माझ्या भावासोबत घडले ते दुसऱ्या कोणाबद्दल घडू नये, अशी मागणी केली.

फडणवीसांची माहिती खोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती देत आहेत, ती खोटी असल्याचा दावा मयत सोमनाथ याच्या लहान भावाने पवारसाहेबांसमोर केला. सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनात नव्हता. त्यासंदर्भातील व्हिडिओ असेल, तर तो माध्यमांकडे उघड करा, असे आव्हान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने केले. फडणवीस साहेबांनी जी मदत जाहीर केली ते आम्हाला मान्य नाही, असेही त्याने सांगितले.

सरकारच्या कारवाईवर लक्ष ठेवणार

शरद पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, राज्य सरकारकडे तुमच्या भावना आपण मांडणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी पाठपुरावा करू. घडलेली घटना गंभीर आहे. पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही, असे सांगून आपण स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर

दरम्यान, काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत आहे. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्यामुळे राज्यातील भाजप सरकार आणि प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काँग्रेस देखील राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे नियोजनात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com