Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : आम्ही का जिंकलो? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Lok Sabha Election Results : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत आम्ही तीन पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
Published on

Lok Sabha Election Result : राज्यात आमच्यासोबत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सांगत, मतमोजणी सुरु असतानाच आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मी फोन केला नाही. त्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

येत्या काळात महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळून जनतेची सेवा करू. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितरित्या काम करणार आहोत. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत आम्ही तीन पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी (Sharad Pawar) सांगितले. (Sharad Pawar News)

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com