Maharashtra Politics: ''मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर..''; शिंदे गटाच्या नेत्यानं सुनावलं

Deepak Kesarkar On Aaditya Thackeray : ..म्हणून माहिती घेण्यासाठी आदित्य ठाकरेंनी प्रवक्ता नेमावा....
Aaditya Thackeray, Deepak Kesarkar
Aaditya Thackeray, Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौऱ्यातील प्रत्येक दिवसाचा खर्च हा साडेसात ते दहा कोटी रुपये खर्च केला आहे. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाताना घटनाबाह्य चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. हा सर्व खर्च राज्यावर आला असेल अशी टीका करतानाच मुख्यमंत्र्यांचा दावोस (Davos) दौरा हा हास्यास्पद होता असा टोलाही माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला होता. आता या टीकेला आता शिंदेगटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

केसरकर म्हणाले, परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो अन् तो दावोसलाच होतो. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे. एवढा साधा कॉमनसेन्स रुणाला नसेल तर त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. पण माहिती घेण्यासाठी त्यांनी किमान प्रवक्ता नेमावा.

तसेच युवकांना मॅच्युरिटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टर्ड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे असा पलटवार दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरेंवर केला आहे.

Aaditya Thackeray, Deepak Kesarkar
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंच्या पत्नीना अखेर दिलासा; भोसरी घोटाळा प्रकरणी अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर

केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक दावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला असं होत नाही. त्यामुळे टीका करण्यापूर्वी थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडं शांत व्हा असा चिमटाही केसरकरांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) काढला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास दावोसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यांना भेटायला अनेक देशांचे प्रमुख आले होते, त्यांनासुद्धा हिणवण्याचा प्रयत्न झाला असा हल्लाबोल करतानाच केसरकरांनी महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे, याचा विचार केला पाहिजे असंही म्हटलं.  

Aaditya Thackeray, Deepak Kesarkar
Shahaji Bapu Patil : शहाजीबापूंविरोधात सांगोल्यात सरपंच आक्रमक; नक्की चाललयं काय?

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आपल्या आक्रमकतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. बांगर यांनी यापूर्वी अधिकारी, पदाधिकारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचं समोर आलं होतं. पण पुन्हा एकदा बांगर वादात सापडले आहे. एका प्राचार्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

यावर भाष्य करताना मंत्री केसरकर म्हणाले, प्रकरण घडलेलं असेल तर गृहविभाग त्यावर कारवाई करेल. आम्हाला आमदार आणि इतर सर्व सारखेच आहेत. बांगर साहेबांशी चर्चा करू. त्यांनी संयम राखला पाहिजे. सरकारची इमेज राखली पाहिजे. संतोष बांगर (Santosh Bangar) हे अॅग्रेसिव्ह आहेत. पण कॉस्टसाठी भांडत असतात. कुठलाही कॉल असेल तरी मारहाण झाली नाही पाहिजे. ते आमदार आहेत म्हणून कारवाई होणार नाही असं समजू नये. पण लोकांवर अन्याय झाला की, शिवसैनिक पेटून उठतो कदाचित तसं असेल असंही त्यांनी यावेळी ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com