Bangladeshi infiltrators : सीमा भेदली, गुप्तचर झोपले? मुंबई महापौरांचा घुसखोर बांगलादेशींविरोधात एल्गार; आदित्य ठाकरेंनी थेट केंद्राला काढला चिमटा

Aaditya Thackeray Questions Modi Govt Over Border Security, Raises Bangladeshi Infiltration Issue in Mumbai : मुंबईच्या महापौर घुसखोर बांगलादेशींच्या मागे लागण्याच्या मुद्यावरून आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांच्या मुलभूत समस्यांकडे लक्ष वेधलं आहे.
aaditya
aadityaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : मुंबईत घुसखोरी करून, फूटपाथवर व्यावसाय करणाऱ्या घुसखोर बांगलादेशींना हटवण्याचा एल्गार भाजप रितू तावडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारताच केला. यानुसार आज मुंबई महापालिकेत बैठक देखील बोलवण्यात आली.

यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र, महापौरांचं अस्तित्व घुसखोर बांगलादेशींवर अवलंबून असून, देशात दिल्लीच्या टोकापासून ते कन्याकुमारीपर्यंत भाजप सरकार असताना, हे झालंच कसं? केंद्रातील मोदी सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचं आणि प्रशासनाच्या त्रुटीचा हा परिपाक आहे का? असा तिखट सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत, केंद्रातील मोदी सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. तसंच मुंबईच्या महापौरांसमोर एवढाचा मुद्दा आहे का? असा प्रश्न करत, मुंबईकरांच्या इतर मुद्यांकडे लक्ष वेधलं आहे.

मुंबईतील (Mumbai) नागरी प्रश्न प्रलंबित असताना, महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्यावर आदित्य ठाकरेंचा आक्षेप आहे. हा आक्षेप घेताना, त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत आहे, अशी टीका केली.

aaditya
Pankaja Munde On Ajit Pawar : ‘तो दिवस आठवतोय…’ पशुसंवर्धन निर्णयावर पंकजाताई भावूक; अजितदादांचं मोठं योगदान चर्चेत (Video)

बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा खरा असेल, तर त्याबाबत काही प्रश्नांची उत्तरे केंद्रातील भाजप सरकारने द्यावीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. बांगलादेशी लोक बेकायदेशीरपणे भारतात कसे घुसले? भारताच्या एका टोकापासून ते नैऋत्येपर्यंत भाजपशासन आहे. असे असताना, या राज्यांमधून बांगलादेशींनी घुसखोरी कशी केली? घुसले तर, घुसले ते इतके दिवस कसे राहिले ? भाजप गेल्या दशकाहून अधिक काळ केंद्र सरकार चालवत आहे? असे बोचणारे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

aaditya
Narhari Zirwal ACB raid : झिरवळांविरोधात 'डर्टी पॉलिटिक्स'? यशोमती ठाकुरांचा स्फोटक दावा; भाजपला थेट फटका

घुसखोरी... केंद्रातील भाजप सरकारचं मोठं अपयश

या राष्ट्रीय सुरक्षेच्या अपयशाला कोण जबाबदार आहे? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? प्रशासकीय अपयश? असे प्रश्न करताना, उत्तर एकच आहे- भाजप! असा खोचक टिप्पणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोरी करत असतील, तर त्यांना रोखण्यात किंवा त्यांना ओळखून हद्दपार करण्यात केंद्र आणि राज्य सरकारांनी आपले अपयश का लपवले? यावरून हेच ​​सिद्ध होते की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्रातील भाजप सरकार मोठे अपयशी ठरले आहे! असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com