मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेली बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीनं पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्तव्य (controversial statement) व्यक्त केलं आहे. तिच्या या व्यक्तव्यामुळे तिला समाजमाध्यमांवर ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर हल्लाबोल केला आहे.
'1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे,' असे विधान कंगनानं केलं आहे. कंगनाच्या (Kangana Ranaut)या विधानाचा समाचार शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Shiv Sena Leader Nilam Gorhe) यांनी घेतला आहे.
'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.' असं विधान कंगनानं केलं आहे. ती एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होती.
निलम गोऱ्हे म्हणाल्या, ''राष्ट्रवतींनी कंगना राणावत हीला नुकताच पदम पुरस्कार प्रदान केला आहे. त्यानंतर तिनं अत्यंत बेजबाबदर,निराधार आणि स्वातंत्र्य योधांचा अपमान करणारे विधान केले आहे. त्याचा मी निषेध करते. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी कंगना राणावतने 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन संपरपित करणाऱ्या योध्यानच अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला त्यामुळे तिचा पदम पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करीत आहे.''
या वेळी कंगना राणावत म्हणाली, ''काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे,'' कंगनाने काही दिवसांपूर्वीच असा दावा केला होता की, 2024 साली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.