Shivsena News : मोठी बातमी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाचा अखेर मुहूर्त ठरला; 'या' दिवशी करणार घोषणा

Political News: अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन करणार
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुनावणी सुरू होती. दोन्ही गटाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम टप्प्यातील सुनावणी 18 डिसेंबरपासून सलग तीन दिवस पार पडली. या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीपर्यंत द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला संध्याकाळी 4 वाजता देणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जानेवारीपर्यंत निकाल देणं अपेक्षित होतं. बुधवारी दुपारी चार वाजता निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Prakash Ambedkar MVA Politics : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ' नेत्यांना 'हा' थेट सवाल

शिवसेनेच्या 16 आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. आता या प्रकरणाचा निकाल येत्या 10 जानेवारीला येण्याची शक्यता आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची अंतिम टप्प्यातील सुनावणी 18 डिसेंबरपासून सलग तीन दिवस सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर १० जानेवारी २०२४ पर्यंत निकाल देण्याचे आव्हान होते. यामुळे आता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या काही आमदारांची उलटतपासणी घेण्यात आली. त्याशिवाय दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या वकिलांकडून सुनावणीत युक्तिवाद झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आता आमदार अपात्रताप्रकरणी निकाल 10 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. संध्याकाळी 4 वाजता हा निकाल विधानसभाध्यक्ष देणार आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत २ फेब्रुवारीला सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी होणार आहे. याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; सुनावणी अंतिम...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com