Eknath Shinde Delhi visit : शिवसेना पक्ष अन् चिन्हं खटला, शिंदेंचा दिल्ली दौरा; शाह, सिंह अन् गडकरी वकील आहेत का? राऊतांना गंभीर शंका

Sanjay Raut Reacts to Eknath Shinde Delhi Visit and Meeting with BJP Amit Shah : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर मोठी शंका उपस्थित केली आहे.
Eknath Shinde Delhi visit
Eknath Shinde Delhi visitSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूपौर्णिमाच्या दिवशी दिल्ली दौरा केला. शिवसेना पक्ष आणि चिन्हांच्या मुद्यावर सुनावणी सुरू असल्याने वकिलाच्या भेटीसाठी गेले असतील, असा दावा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर मोठी शंका उपस्थित केली आहे. 'केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून न्यायालयावर दबाव आणू इच्छितायत का?' अशी मोठी शंका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे त्यांचे वकील आहेत का? वकिलांना भेटायला गेले ना, वकिलांना भेटले पाहिजे, तिथं चर्चा केली पाहिजे. यांच्या माध्यमातून न्यायालयावर दबाव आणू इच्छितायत का? त्यांच्या मनात कोणती भीती सतावत आहे", असा सवाल खासदार राऊत यांनी केला.

'वकील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील बोलू शकले असते, एकनाथ शिंदे स्वतः काळा कोट घालून सर्वोच्च न्यायालयात (Court), तर जाणार नाहीत ना! म्हणजेच, अमित शाह, राजनाथसिंह किंवा अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून हा खटला आतापर्यंत रेंगाळत ठेवला आहे. निवडणूक आयोगाकडून ज्यापद्धतीने हवे तसे निर्णय घेत, त्याचपद्धतीने तुम्ही करत आहात, हे आता स्पष्ट होत आहे', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Eknath Shinde Delhi visit
Maharashtra Live Updates : अजित पवार यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाकेंची पुन्हा जीभ घसरली

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हं, या संबधित असलेल्या सुनावनीनिमित्ताने वकिलांच्या गाठभेटीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाची राष्ट्रीय पातळीवर बांधणी करण्याबाबत हालचाली सुरू असून दिल्लीत इतर राज्यातील प्रमुखांशी बैठक झाल्याचे कळते. सुनील प्रभू यांच्यासह 50 नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहे, असे संकेत संजय राऊत यांनी दिले. त्याप्रकारचे पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. एकनाथ शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना, मला दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे. यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील, असे मला संकेत आहेत. त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com