Bandra Fort Party Controversy : वांद्रे किल्ल्यावरील वादग्रस्त 'ओली पार्टी'; भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीचा फोटो ठाकरेंच्या शिलेदारानं आणला समोर

Bandra Fort political fight between BJP and Thackeray: मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या मद्य पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादंग निर्माण झाला आहे.
Bandra Fort party controversy
Bandra Fort party controversySarkarnama
Published on
Updated on

Controversial Event Bandra Fort : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी मुंबईतील वांद्रे किल्ल्यावरील इव्हेंटला भाजप मंत्री आशिष शेलार सहभागी झाल्याचा फोटो समोर आला आहे.

अखिल चित्रे यांनी हा फोटो त्यांच्या 'एक्स'वर शेअर करताना, आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, 48 तास उलटले, तरी का कुणावर कारवाई झाली नाही, असे म्हटले आहे.

मुंबईतील वांद्रे किल्ल्यावरील इव्हेंटबरोबर झालेली ओली पार्टीचे स्थानिकांनी चित्रित केलेला आणि शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. या किल्ला परिसरात मोठ्या आवाजात संगीत, मद्यपानासह पार्टी सुरू असल्याचे व्हिडिओमधून दिसत असल्याने शिवप्रेमी अन् किल्लाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.

या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कारवाईचा आदेश दिला आहे. पण मुख्यमंत्र्‍यांनी आदेश देऊन देखील कारवाई झालेली नाही. यावरून अखिल चित्रे यांनी पुन्हा त्यांच्या एक्स हँडलवर किल्ल्यावरील इव्हेंटचा फोटो शेअर करत भाजप मंत्री आशिष शेलार यांची हजेरी असल्याचं दर्शवत कारवाई होत नसल्याचा दावा केला.

Bandra Fort party controversy
Ganesh Naik Janata Darbar case : गणेश नाईकांच्या दरबारावर टाच? याचिकेवर आज सुनावणी

अखिल चित्रे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, वांद्रे किल्ल्यावरील प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना? आता हा पाहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, 48 तास उलटले, तरी का कुणावर कारवाई झाली नाही. 'किल्ले अडवा, अड्डे बनवा' हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयाने हाती घेतलं आहे वाटतं!, असा उपरोधिक टोला लगावला.

Bandra Fort party controversy
Sangamner municipal election : संगमनेरचं वातावरण ऐन थंडीत तापलं; तांबेंच्या सौभाग्यवती, तर खताळांच्या भावजयीमध्ये थेट लढत

'एक्स'वर पोस्ट करताना, आशिष शेलार यांना ही पोस्ट टॅग करताना, हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन? असा प्रश्न केला आहे. तर राज्याच्या सीएमओ कार्यालयाला, अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर पोलिस.., असा अर्धवट प्रश्न सोडून राज्याचे उत्पादन शुल्क विभाग कारवाई करतील का? असे प्रश्न अखिल चित्रे यांनी उपस्थित केले आहेत.

मंत्री शेलार गप्प का?

वांद्रे किल्ल्यावर झालेल्या पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागांनी परवानगी दिली होती. तसेच संयोजक म्हणून पर्यटन विभागाचेही नाव असल्याचा आरोप अखिल चित्रे यांनी पूर्वीच केला आहे. ऐतिहासिक वास्तूवर मद्य पार्ट्या सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार गप्प का आहेत? असाही प्रश्न केला होता.

ऐतिहासिक वारसांचे व्यापारीकरण

मुंबईतील किल्ल्यांपासून सुरुवात करून पुढे महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवरही, असे व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्याचा सरकारचा मानस आहे का? असे प्रश्‍न उपस्थित करीत यामुळे ऐतिहासिक वारसा संरक्षित करण्याऐवजी त्याचे व्यापारीकरण होण्याची भीती अखिल चित्रे यांनी व्यक्त केली.

सरकारवर टीकास्त्र

वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या वांद्रे किल्ल्यावर मद्य पार्टीसाठी परवानगी कशी दिली जाते? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

...तर संबंधितांवर कारवाई!

वांद्रे किल्ल्यावरील पार्टीबाबत माध्यामांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या घटनेचा व्हिडिओ मी पाहिलेला नाही; पण मला काही लोकांनी याबाबत सांगितले. अशा प्रकारे पार्टीसाठी परवानगी दिली गेली असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com