आमदारकीची हळद लावून बसलोय, पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही!

''जो पर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत लय चांगलं होतं. पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला,'' असे आनंद शिंदे (singer anand shinde) म्हणाले.
singer anand shinde
singer anand shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठविली आहे. पण राज्यपालांनी या नावांना अजूनही मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा हीरमोड झाला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी इच्छुक असलेले गायक आनंद शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

''''जो पर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत लय चांगलं होतं. पण जेव्हा आमदारकीसाठी गेलो तेव्हा गाणही बंद झालं अन् सगळचं बंद झाले. एवढी मजा कोणीच केली नसेल, पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला,'' असे आनंद शिंदे (singer anand shinde) म्हणाले.

आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी कॉग्रेसकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते.''आता हळद लावून बसलो पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही,'' असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

विधानपरिषदेच्या 12 जागांवरील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न सध्या गाजत आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp)आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत शिंदे काही दिवसापूर्वी म्हणाले होते की, राज्यपाल संविधानाचा विचार नक्की करतील. राज्यपाल पण चांगलेच आहेत. त्यांनी पण संविधाव वाचलेले असेल. संविधानात तरतूद आहे, त्यामुळे राज्यपाल सुरक्षित आहेत. अन्यथा त्यांच्यावर समाजाचा दबाव आला असता.

singer anand shinde
मोदींना उपरती झाली ; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

येत्या 1 जानेवारी 2022 मध्ये विधान परिषदेतील 8 आमदार निवृत्त होत आहेत . त्यामध्ये सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर , अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार , गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला- बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे. आधीच महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांसाठी बारा नावांची यादी देण्यात आलेली आहे. ती देखील प्रलंबित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com