Maratha Reservation : ...म्हणून चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा!

Chandrakant Patil News : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार...
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSarkarnama

Pune : भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मराठा (Maratha Reservation) समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी (दि.18 ) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र,याचदरम्यान, समितीच्या या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटलां ( Chandrakant Patil) विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

Chandrakant Patil News
Ajit Pawar News : 'शुगर वाढल्याने ऑपरेशन पुढं ढकललं' ; अजित पवारांच्या पूर्णविरामानंतरही शिंदे गटाचा सूचक दावा!

नेमकं काय घडलं?

भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) चांगलाच आक्रमक झाला. यावेळी मराठा समाजाच्या समन्वयकांनी पाटील यांच्यासह सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. परंतू, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही पाटील यांना देता आली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम यांनी केला आहे.

अशोक चव्हाणांनंतर पाटील यांच्याकडे जबाबदारी...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला होता. तेव्हा सरकावर टीका करण्यात भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आघाडीवर होते. तसेच आरक्षण रद्द होण्याचे सारे खापर महाविकास आघाडीवर त्यांनी फोडले होते.

Chandrakant Patil News
Vinod Tawde : येत्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?; 'त्या' अहवालाबद्दल विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण..

राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे फडणवीस सरकारकडून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. पाटील हे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यावर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करून टीकेची झोड उठविण्यात आघाडीवर होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com