Sanjay Raut : 'मिस्टर फोर्टी परसेंट आहेत, हे सगळे!' राऊतांचा महायुती सरकारच्या खादाडपणावर हल्ला

Shiv Sena MP Sanjay Raut targeted the Mahayuti government commission in Mumbai: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कामातील कमिशन सांगतिल्यानं वाद निर्माण झाला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर सकाळी सकाळी जोरदार तोफ डागली. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दसरा मेळाव्याला काय बोलणार याकडे लक्ष लागले असतानाच खासदार राऊत यांनी महायुतीमधील प्रमुख नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

"हे महायुती सरकार खादाड सरकार आहे. फोर्टी परसेंट कमिशन खातं. मिस्टर फोर्टी परसेंट आहेत, हे सगळे! मिस्टर मुख्यमंत्री फोर्टी परसेंट, अजित पवार फोर्टी परसेंट, फडणवीस फिफ्टी परसेंट", असा खणखणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळातील निर्णयावर आणि बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील नाराजीनाट्यावर बोलताना संजय राऊत महायुती सरकारवर तोफ डागली.

हे सरकार खादाड सरकार असल्याचा गंभीर टोला राऊतांनी लगावला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांवर इतर राज्यातील निवडणुकींच्या खर्चाची जबाबदारी असल्याने महाराष्ट्राची लूटच लूट सुरू असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Sharad Pawar : ‘NCP’ला धक्का! 'तुतारी' हाती घेण्यासाठी रांगा लागल्या असतानाच बड्या नेत्यानं दिला राजीनामा

विधिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "ही माहिती समोर आलेली आहे. खरं म्हणजे, महायुतीत कोणाचाही पायपोस कोणात नाही. हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या छाताडावर बसलं आहे. अमित शाह यांना फक्त महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. मराठी माणसाला कमजोर करायचे आहे. म्हणून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडली. यातून त्यांनी सरकार स्थापन केले. असं सरकार एक जीवाने, एक दलाने कसे काम करेल?"

Sanjay Raut
11th October in History : चंद्रावरील स्वारीची 'या' दिवशी झाली होती रंगीत तालीम

संजय राऊत पुढं म्हणाले, "बर हे सगळे खा-खा-खा खाणारे लोकं आहेत. इतकं खादाड सरकार कधी पाहिलं नाही. 40 टक्के कमिशन खातं. मिस्टर फोर्टी परसेंट आहेत, हे सगळे. मिस्टर मुख्यमंत्री फोर्टी परसेंट, अजित पवार फोर्टी परसेंट, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फिफ्टी परसेंट, राज्याला काय मिळतंय? या कमिशनबाजीमुळे यांचे आपपास पटत नाही. प्रत्येकाला निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा हवा आहे".

यातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांच्या निवडणुकींची जबाबदारी आहे. हरियाणात भाजपच्या निवडणुकीचा खर्च इथल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. किती हजार कोटी असेल, कोठून आले पैसे? यापुढे देखील इतर राज्यांच्या निवडणुकांचा खर्च महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टाकण्यात आला आहे. म्हणजेच, महाराष्ट्रात लूटच लूट, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com