Sharad Pawar : ‘NCP’ला धक्का! 'तुतारी' हाती घेण्यासाठी रांगा लागल्या असतानाच बड्या नेत्यानं दिला राजीनामा

Assembly Election 2024: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘तुतारी’कडे अनेकांचा ओढा आहे. मात्र, त्याआधीच पदाधिकाऱ्यांनी आणि एका नेत्यानं राजीनामा दिला आहे. हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का मानला जातोय.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: लोकसभेला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरदचंद्र पवार ) ‘स्ट्राइक रेट’ 80 टक्के राहिला. 10 पैकी 8 जागा जिंकल्यानं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे.

यातच राष्ट्रवादीला ( शरदचंद्र पवार ) एक धक्का बसला आहे.  विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. याला कारण ठरलंय अमरावतीच्या जिल्ह्याध्यक्षांना हटवणं.

अमरावतीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून हटवलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकच नाराजीचं वातावरण पसरलं आहे. विश्वासात न घेता आपल्याला पदावरून हटवलं, असं प्रदीप राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. त्यांच्यावर प्रदेश संघटक सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या नाराज 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा मतदारसंघाची जबाबदारी होती.

Sharad Pawar
Haryana Assembly Result 2024 : हरियाणातील पराभव कुणामुळे? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं सांगितलं कारण

याबद्दल प्रदीप राऊत म्हणाले, “विश्वासात न घेता आपल्याला पदावरून हटविण्यात आलं. पाच महिन्यांत आम्ही पक्ष संघटना मजबूत केली. नव्या नेतृत्त्वाची फळी उभी केली. असं असताना कुठलेही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकण्यात आलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान आहे.”

Sharad Pawar
Congress Vs BJP News: काँग्रेसच्या 'हाता'चा अनेकांना साक्षात्कार

“आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत. लवकरच शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ,” असा इशारा प्रदीप राऊत यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com