Sushma Andhare On Eknath Shinde : 'ते राज्याची जबाबदारी कशी संभाळणार'; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला...

Sushma Andhare News : सुनील राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
Eknath Shinde-Sushma Andhare
Eknath Shinde-Sushma Andhare Sarkarnama

Sushma Andhare News : उद्धव ठाकरे यांच्या लंडन दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा बरा, अशा शब्दात टीका केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावर मुख्यमंत्री शिंदे यांना खोचक शब्दात सुनावले आहे. 'ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळली नाही, ते राज्याची जबाबदारी कशी संभाळणार', अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या लंडन दौऱ्यावर टीका करताना मला काम करावी लागतात. त्यामुळे मी काही लंडनाला जावू शकत नाही. लंडनपेक्षा राज्य बरं, असे म्हणाले होते. सरकारने गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसले. माझ्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली. लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा चांगला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde-Sushma Andhare
Jalgaon News: EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही अचानक बंद; उमेदवाराच्या फोननंतर प्रशासनाला आली जाग

मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या टीकेवर संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आमदार सुनील राऊत प्रत्युतर देत तुम्हाला इंग्रजी येते का? असा बोचरा सवाल केला होता. सुनील राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपवर देखील निशाणा साधला आहे. Shiv Sena Uddhav Thackeray party deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde

सुषमा अंधारे म्हणल्या, "एखाद्याचा विश्वासघात करूत व्हाया सुरत, व्हाया गुवाहाटी करत तोंड लपवून जाणे. अडीच-तीन हजार महिलांचा शोषण करून जर्मनीला पळून जाणे, यासाठी सत्ताधाऱ्यांची मदत घेणे किंवा कसीनोला जाऊन जुगारावर पैसे उडवणे, यासगळ्यापेक्षा कुटुंबाला वेळ देणे कधीही चांगलेच. मुख्यमंत्र्यांना ही सर्व फिजूल कामे वाटत असेल तर, कुटुंब म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांना कळलेले नाही. स्वतः मुलाला हाॅस्पिटल टाकून देणे शक्य झाले नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रती मुख्यमंत्र्यांना जबाबदारी कळलीच नाही". ज्यांना कुटुंबाची जबाबदारी कळत नसेल, ते राज्याची जबाबदारी कशी उचलणार? असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Eknath Shinde-Sushma Andhare
Ram Shinde V/S Rohit Pawar : 'झळ टंचाईची, कळ सोशल मीडियावर'; शिंदे-पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलाय 'सोशल वाॅर'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com