Nagar News : नगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा तीव्र झाल्या असून, लोकप्रतिनिधींनी आपआपल्या भागावर लक्ष केंद्रीत करत दुष्काळी भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही मदत करताना यातून मात्र राजकीय श्रेयवाद रंगवला जात आहे. कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघातील दोन्ही आमदार कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर टंचाई केलेल्या मदतीवरून राजकीय श्रेयवाद रंगला आहे.
नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात पिकांचा मोठे नुकसान झाले. या अवकाळीनंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. यातून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडील संस्थांमार्फत देखील सेवाभाव म्हणून पाणी टँकर सुरू केले आहेत. परंतु यावरून भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला आहे. दुष्काळात आमच्या लोकप्रतिनिधींनी कशी मदत केली, याची आकडेवारी सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार रोहित पवार यांनी पाणी टंचाईत कर्जत-जामखेडमधील लोकांना दिलासा देण्यासाठी एकात्मिक संस्थेकडून काही टँकर मदतीला आले. एकात्मिक संस्थेकडून दिलेले टँकर, त्याच्या खेपा आणि टँकरच्या पाण्याचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. यानंतर भाजपचे खासदार सुजय विखे आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपल्या यंत्रणेकडून मागणीनुसार गावांना टँकर उपलब्ध करून दिले गेले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) टंचाईबाबत कर्जत-जामखेडमध्ये लक्ष ठेवून असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी सांगितले. Political credulity over water scarcity in Karjat-Jamkhed
दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर टंचाई काळात गावांना कशी मदत केली, याची माहिती शेअर केली जात आहे. यातून कार्यकर्ते एकमेकांवर आरोप देखील करत आहेत. यातच आमदार पवार यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर नगर-करमाळा बायपास रस्त्याच्या कामासाठी 22 कोटी रुपये मंजूर झाल्याची पोस्ट त्यांच्या पत्रासह शेअर करण्यात आली. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमदार पवार गोलमाल करत असल्याचे म्हटले. आमदार पवार यांच्या या पोस्टवर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.