Telangana Assembly News : काँग्रेसने नाकारलेले दोन बंडखोर बीआरएसकडून लढले अन् जिंकले..

BRS News : दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या कॉंग्रेसच्या दोन नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली.
Telangana Assembly Elections
Telangana Assembly ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : तेलंगाना विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने सत्ता कायम राखली असून दोन टर्म सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीला राज्यातील जनतेने नाकारले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने आठ ठिकाणी विजय मिळवून १३ टक्के मते मिळवून मोठी झेप घेतली आहे. (Telangana Assembly News) २०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने विजय मिळवलेल्या १९ पैकी ६ ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Telangana Assembly Elections
Ashok Chavan News : तेलंगणाच्या विजयाची अशोक चव्हाणांनी दिलेली गॅरंटीही खरी ठरली...

तर ६ ठिकाणी विजयी झालेले उमेदवार अन्य पक्षातून आयात केलेले आहेत. भारत राष्ट्र समितीच्या २१ आमदारांनी आपले गड कायम राखले आहेत. (Congress) निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी चालू होते. (Maharashtra) तसेच पक्षाने उमेदवारी नाकारलेले अन्य पक्षातून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात बंडखोरी करतात. सर्वच पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागते.

तेलंगानातील लालबहादूर नगर आणि माहेश्वरम या ठिकाणी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसच्या उमेदवारांनी भारत राष्ट्र समितीची उमेदवारी मिळवत विजय प्राप्त केला आहे. (K.Chandrasekhara Rao) लाल बहादूर नगर येथील कॉंग्रेसचे आमदार देवीरेड्डी सुधीर रेड्डी व माहेश्वरम येथील आमदार सविथा इंद्रा रेड्डी यांनी २०२३ च्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीची उमेदवारी मिळवत विजय मिळवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवोदितांना संधी देण्यापेक्षा मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला. विजयी झालेल्या उमेदवारात तब्बल बारा उमेदवार असे आहेत ज्यांनी मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली व विजय प्राप्त केला.

राज्यात सत्ता प्राप्त केलेल्या कॉंग्रेस पक्षाचे असे आठ आयात उमेदवार विजयी झाले आहेत. २०१८ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या भारत राष्ट्र समितीच्या पाच उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे. कोल्लापूर येथून जुपल्ली कृष्ण राव, नाकरेकल येथून वेमुला वीरेशम, पिनापक्का येथून पयम वेंकटेश्वरलू, येलांडू येथून कोरम कनकैय्या व खम्मम मतदारसंघातून तुम्मला नागेश्वर राव यांचा विजयी उमेदवारात समावेश आहे.

२०१८ च्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे गड्डम विनोद हे बेलमपल्ली मतदारसंघातून तर मलरेड्डी रंगारेड्डी हे इब्राहिमपटनम मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर होते. २०२३ मध्ये कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते दोघेही विजयी झाले. भूपलपल्ले मतदारसंघातून विजयी झालेले कॉंग्रेसचे उमेदवार गन्द्रा सत्यनारायण राव यांनी २०१८ मधील निवडणुकीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक कडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत सिरपूर मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार पलवई हरीश बाबू व निर्मल मतदारसंघातील अलेटी महेश्वर रेड्डी यांनी २०२३ मध्ये भाजपची उमेदवारी मिळवत यश प्राप्त केले. भारत राष्ट्र समितीनेही हाच कित्ता गिरवत २०१८ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या कॉंग्रेसच्या दोन नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. हुजुराबाद येथील कौशिक रेड्डी आणि नरसापूर येथील वकीटी सुनिया लक्ष्मा रेड्डी यांनी भारत राष्ट्र समितीची उमेदवारी मिळवून यश मिळवले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com