TET Exam : TET पेपर फोडणाऱ्या 27 जणांच्या नाड्या आवळल्या: भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या 2 सख्ख्या भावांचाही समावेश

27 arrested in TET exam scam : महाराष्ट्रातील TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी २७ आरोपींना अटक केली असून भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या दोन सख्ख्या भावांचाही यात समावेश आहे. सविस्तर बातमी वाचा.
TET Exam : TET पेपर फोडणाऱ्या 27 जणांच्या नाड्या आवळल्या: भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या 2 सख्ख्या भावांचाही समावेश
Published on
Updated on

शिक्षक पात्रता परीक्षा TET चा पेपर फुटल्याप्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी 27 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. तपासादरम्यान या गैरप्रकाराची साखळी थेट बिहारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. अद्याप काही परराज्यातील तरुण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

22 नोव्हेंबरच्या रात्री 800 सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे TET चा पेपर फोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही परीक्षार्थींनीही पेपर आधीच मिळाल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणात कराड तालुक्यातील बेलवाडी येथे करिअर अकॅडमी चालविणारे महेश गायकवाड आणि त्यांचा भाऊ संदीप गायकवाड यांची नावे पुढे आली. हे दोघे सातारा जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भगवान गायकवाड यांचे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे.

तपासात बिहारमधील रितेशकुमार आणि महंमद साहिद अझहर हुसेन यांची नावेही उघड झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिक्षक, क्लास चालक, तसेच इतर संबंधित अशा एकूण 28 संशयितांचा समावेश आहे. त्यामध्ये महेश भगवान गायकवाड (41), संदीप भगवान गायकवाड (46), दत्तात्रय आनंदा चव्हाण (32), गुरुनाथ गणपती चौगले (38), अक्षय नामदेव कुंभार (27), किरण साताप्पा बरकाळे (30), नागेश दिलीप शेंडगे (30), राहुल अनिल पाटील (31), दयानंद भैरू साळवी (41), अमोल पांडुरंग जरग (35),

स्वप्नील शंकर पोवार (35), रोहित पांडुरंग सावंत (35), अभिजित विष्णू पाटील (40), इंद्रजित प्रवीण पुस्तके (31), रणधीर तुकाराम शेवाळे (46), तेजस दीपक मुळीक (22), प्रणय नवनाथ सुतार (32), संदीप शिवाजी सुतार (40), श्रीकांत नथुराम चव्हाण (43), महेश नारायण बोरनाक (43), तानाजी मुरलीधर डोईफोडे (35), अविनाश पांडुरंग कणसे (40), रामदास नारायण कळंत्रे, आकाश बाबासाहेब कदम (26), दीपक चंद्रकांत कांबळे (30), दत्तात्रय आण्णासाहेब लंबे (36), रितेशकुमार आणि महंमद साहिद अझहर हुसेन यांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहारावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com