Shiv Jayanti : आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती होणारच; राज्य सरकार सहआयोजक

Agra Fort News : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, आर. आर. पाटील फाऊंडेशनसह इतर संस्थांचा पुढाकार
Shivaji Maharaj
Shivaji MaharajSarkarnama
Published on
Updated on

Shiv Jayanti in Red Fort : आग्रा येथील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यासाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने परवानगी मागितली होती. ती परवानगी पुरातत्व विभागाने खासगी व्यक्ती/संस्थेचे कारण देत नाकारली होती. आता राज्य सरकार या कार्यक्रमासाठी सहआयोजक म्हणून सहभाग घेणार आहे. त्यामुळे लाल किल्ला परिसरात शिवजयंती कार्यक्रमास परवानगी देण्यात आली आहे.

आग्रा (Agra) येथील लाल किल्ला (Red Fort) परिसरात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने सुरुवातीस आक्षेप घेतला होता. यावर शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. यातूनच आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील (Vinod Patil) यांनी दिल्ली हायकोर्टात (Highcourt) धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने पुरातत्त्व खात्याला परवानगीला अडचणीबाबत विचारला केली. त्यावर पुरातत्व खात्याने २००४ च्या नियमानुसार खासगी व्यक्तीला परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकार सहआयोजक होणार असेल तर परवानगीचा विचार करू, असेही पुरातत्त्व खात्याने स्पष्ट केले होते.

हायकोर्टातील सुनावणीनंतर महाराष्ट्र सरकारने पुरातत्व खात्याला पत्र दिले. त्यात हायकोर्टाने घालून दिलेल्या अटींप्रमाणे शिवजयंती कार्यक्रमाचे सहआयोजक होण्यास तयार असल्याचे नमूद केले. आता महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यास तयार असल्याने लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कार्यक्रमासाठी १८ आणि १९ फेब्रुवारी या दोन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात १८ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची तयारी करण्यात येईल. तर १९ फेब्रुवारीला मुख्य कार्यक्रम होणार आहे.

परवानगीबाबात महाराष्ट्र सरकारच्या (Maharashra Government) वतीने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, संभाजीनगर (Ajinkya Devgiri Pratishthan, Sambhajinagar) या संस्थेला पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.

त्यात म्हटले आहे की, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान लाल किल्ला परिसरात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती साजरी करणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सहआयोजक म्हणून महाराष्ट्र सरकार असणार आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी दोन दिवसांची परवानगी दिली आहे. दरम्यान या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्न केल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com