Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 14 ऑक्टोबर, 2024 च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा धमाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट... प्रागतिक आघाडीकडून 20 ते 22 जागांची मागणी...तर सोबतच रायगडच्या शेकापच्या पारंपरिक जागांचीही मागणी
शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना वाहतूक कोंडीचा फटका...मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीला जाताना वाहतूक कोंडी... केसरकरांनी चालत गाठलं बैठकीचं ठिकाण
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न... पालकमंत्री हसन मुश्रीफाच्या हस्ते पार पडला कार्यक्रम...
नांदेडच्या हनुमान गड परिसरात जिजाऊ सृष्टीची उभारणी... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण... ही वास्तू नवीन पिढीला प्रेरणा देणारी ठरेल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य...
विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित... 150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता... विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती...
भाजपच्या छाननी समितीची नवी दिल्लीत बैठक... विधानसभा उमेदवार निश्चितीबाबत यात चर्चा... एक-दोन दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता...
मराठीचा डंका अधिक जोमाने वाजणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य... चर्नी रोडच्या जवाहर बालभवन परिसरात मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर. भूमीपूजन सोहळ्यासह हिकमत उढाण यांच्या पक्षप्रवेशालाही राहणार उपस्थित.
इंदापूरच्या काँग्रेस भवनावरून नवा वाद. भवनाचा ताबा अद्यापही हर्षवर्धन पाटलांकडेच. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी घेतला आक्षेप.
येवल्यातील शिवसृष्टी जवळ सुरक्षेत वाढ, जरांगे-जरांगे-भुजबळ समर्थकांमधील राड्यानंतर तणावाचं वातावरण... याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.