Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्याआधी सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकप्रिय निर्णय घेण्यात आले. प्रामुख्याने मुंबईतील वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाचा जवळपास तीन लाख वाहनांना फायदा होणार आहे.
आधीच्या मंत्रिंमडळाच्या बैठकीत विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारीही आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर आता सरकारने राज्य कौशल्य विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
- मुंबईतल्या 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ 12 वाजेपासून अंमलबजावणी.
- आगरी समाजासाठी महामंडळ
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट
- ‘उमेद’साठी अभ्यासगट
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.