मोदींच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाचे पाकिट चोरीला अन् तत्परतेने दोघांना अटक

मोदींच्या ताफ्यातील एक सुरक्षारक्षक काल पाकिटमारांचा बळी ठरला
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सुरक्षा (Pm Modi Security) सर्वोच्च दर्जाची मानली जाते. एसपीजी कमांडोंचे (SPG Commando) अत्यंत हुशार आणि आश्वासक दल त्यांच्या सुरक्षेत तैनात असते. पण मोदींच्या याच ताफ्यातील एक सुरक्षारक्षक काल पाकिटमारांचा बळी ठरला आणि पोलिसांची एकच धावपळ झाली. मात्र पोलिसांनी यानंतर एक-एक पुरावा जोडत तत्परतेने दोघांना अटक केली आहे.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील एसपीजी कमांडो सुभाष चंद्रा मुंबईच्या लोकलमधून विलेपार्ले ते महालक्ष्मी प्रवास करत होते. त्यावेळी चंद्रा यांचे पाकीट चोरांनी मारले. या प्रकरणी त्यांनी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, आणि पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान आरोपींनी चंद्रा यांच्या पाकिटातील कार्डमधून १९ हजार रुपये काढल्याचे समोर आले. यानंतर रेल्वे पोलिसांनी एक-एक पुरावा जोडत संशयित आरोपी राणु पांडे याला अटक केली.

Narendra Modi
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणूका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

राणुच्या चौकशीत पाकिटातून चोरलेले पैसे तो स्वत:ला ठेवायचा आणि पाकिटातील बँकेचे कार्ड हैदर समसुद्दीन शेखला मिरारोड इथे द्यायचा. त्यानंतर हैदर वायफाय अँक्टिव असलेल्या कार्डद्वारे पैसे उकळायचा. हैदर याने अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याचे प्रथामिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहे.

Narendra Modi
मूड महाराष्ट्राचा : सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप सगळ्यात मोठा पक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com