नाशिक : येथील ३५ भाविक चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. (35 pilgrims visited to chardham tour to Uttarakhand) यावेळी त्यांनी कोरोना चाचणी तसेच दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगले होते. (They have covid19 test & vaccine certificate) तरीही उत्तराखंड सरकारने त्यांनी जबरदस्तीने १४ दिवसा क्वारंटाईन (But they stuck due to Uttarakhand administration quarantine them for 14 days) केल्याने ते अडकून पडले. ही माहिती मिळताच खासदार हेमंत गोडसे (M. P. Hemant Godse) यांनी तप्तरतेने प्रयत्न करून त्यांची सुटका केली. त्यामुळे हे सर्व प्रवासी आता परतीच्या मार्गावर आहेत.
हे सर्व यात्रेकरू त्र्यंबकेश्वर येथील होते. ते यात्रेला गेल्यावर त्यांना काही यात्रास्थळांचे दर्शऩ झाल्यावर प्रशासनाने अचानक त्यांना अडविले. त्यांची तपासणी केली. या यात्रेकरूंनी त्यांची सर्व कागदपत्र दाखविली. तरीही त्यांना रोखण्यात आले. यात्रेला जातांना त्यांनी आरटीपीसीआर रिपोर्ट व लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत घेतले होते. तरी देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले. त्यांची पुन्हा सक्तीने अँटिजेंन टेस्ट केली गेली. यातील ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. परंतु यातील एकाचा चाचणी अङवाल पॉझीटीव्ह आला. त्यानंतर त्या व्यक्तीची पुनःश्च चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. तरी देखील त्यांना कोरोंटाईन करत १४ दिवसा करीता डांबून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना सुटका करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून मदतीची गरज होती.
यातील सचिन लोंढे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांच्याशी संपर्क केला. त्या अडकलेल्यांपैकी सामाजिक कार्यकर्त्या गितांजली गाजरे (जाधव) यांनी श्री. कडलग यांच्याशी काँन्फरंन्स काँल संपर्क केला. त्या खुप अस्वस्थ वाटल्या. दहा बारा तासांपासून अडकल्याने ते खुप त्रस्त झाले होते. त्यांनी अनेकांना फोन केले मात्र फारसा उपयोग झाला. त्यामुळे त्यांनी मदतीची विनंती केली. तेव्हा श्री. कडलग यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क केला. ते बैठकीत होते. मात्र त्यांना ही माहिीत मिळाल्यावर त्यांनी तातडीने अडकेल्या नागरिकांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून भाविकांना मदत केली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी ते संसद भवन, महाराष्ट्र सरकार असे वीस ते पंचवीस ठिकाणी संपर्क झाल्यावर त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. त्यानंतर श्री. सचिन यांनी श्री. कडलग यांना सर्व सदस्यांना दर्शनाची परवानगी दिली आहे. व सर्व सुखरूप असल्याचे कळविले. शिवसेनेचे खासदार गोडसे यांनी तप्तरतेने मदत केली. त्यामुळे सर्व भाविकांनी त्यांचे आभार मानले.
रुद्रप्रयागला अडकलेले प्रवासी...
या भाविकांत प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे- जाधव, मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कानोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करांकळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर, सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथु पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे, रंजना पाटील, श्रीमती स्नेहा.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.