High Court News : मतदार यादीत 43 हजार बोगस नावे ; निवडणूक आयोगाला नोटीस

43 thousand double names in Muktainagar Assembly Constituency :असे हजारो नावे असल्याने मतदार यादीतील हा घोळ दूर केल्यानंतरच मतदार यादी प्रसिद्ध करण्याची विनंती आमदार पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती.
Bombay High Court bench Aurangabad
Bombay High Court bench AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon District News : मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील मतदार यादीमध्ये तब्बल 43 हजार मतदारांची नावे एका पेक्षा अधिक वेळा असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांनी दिले आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने 1 ऑगस्ट 2024 रोजी मतदार पुर्नविलोकन कार्यक्रम जाहिर केला होता. (Aurangabad High Court) त्यावर 6 ते 20 ऑगस्ट पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी मतदार यादीत 43 हजार मतदारांची नावे दोन वेळा, तीन वेळा आणि काही ठिकाणी तर चार वेळा असल्याचा आक्षेप घेतला.

सदर मतदारांची नावे पत्ता, फोटो आणि मतदार यादीतील गावांची नावे काही ठिकाणी एकच तर काही ठिकाणी वेगळी दिसत आहे. असे हजारो नावे असल्याने मतदार यादीतील हा घोळ दूर केल्यानंतरच मतदार यादी प्रसिद्ध करण्याची विनंती आमदार पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती.

Bombay High Court bench Aurangabad
High Court News : बापू आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना जामीन

त्यांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले की, तक्रारीच्या अनुषंगाने मतदार यादीतील दुबार नावे शोधून योग्य कार्यवाही करण्यासाठी ओटर सर्च पोर्टल उपलब्ध झाल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करता येईल. (Jalgaon) प्रत्यक्षात मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रावर निर्णय घेतला नाही.

आमदार पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबर पर्यंत म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

Bombay High Court bench Aurangabad
Jalgaon News: माजी मंत्र्याने गटविकास अधिकाऱ्यांना झापले! काय आहे प्रकरण?

याचिकेवर 16 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे ॲड अजित कडेठाणकर यांनी काम पाहिले. तर जळगाव जिल्हाधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्यातर्फे ॲड. अलोक शर्मा यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com