खळबळजनक : राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाविरुद्ध नाशिकमध्ये फसवणुकीचा गुन्हा

वैभव अशोक गेहलोत (Vaibhav Gehlot) याच्याशी ओळख असल्याचे सांगून काॅंग्रेस पदाधिकाऱ्याने घातला गंडा
Suspected velora`s photo with Rajsthan CM Ashok Gehlot.
Suspected velora`s photo with Rajsthan CM Ashok Gehlot.Sarkarnama

नाशिक : राजस्थान, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये आपल्या ओळखी आहेत. सरकारमधील लोकांच्या माध्यमातून विविध टेंडर मंजुर करून पैसे मिळवून देतो. असे सांगून गुजरात (Gujrat) प्रदेश काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस सुरत येथील सचिनभाई पुरुषोत्तमभाई वेलेरा (Sachinbhai Velora) यांनी सुमारे सात कोटींचा लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत पोलिसांत काँग्रेस नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Suspected velora`s photo with Rajsthan CM Ashok Gehlot.
आयुक्तांनी भाडे आकारणीचे पत्र दिले; महापौर सतीश कुलकर्णी यांनी निवासस्थान सोडले!

वेलोरा यांचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संबंध असुन श्री. गेहलोत यांनी श्री. वेलोरा यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्याचे छायाचित्र व भेटीचा वृत्तांत गेहलोत यांनी ट्वीट केल्याचा दावा यासंदर्भात तक्रार देणारे सुनील पाटील यांनी केला आहे. श्री. वेलोरा यांनी आपली राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा केला होता. त्याने विविध छायाचित्रे देखील दाखवल्याने त्याच्या विश्वास बसला. त्यात त्याने फसवणूक केली. त्यामुळे एकंदरच काँग्रेस नेत्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याची चर्चा आहे.

Suspected velora`s photo with Rajsthan CM Ashok Gehlot.
महापौर झाल्यावर एक दिवसही वाया न घालविता शहरासाठी काम केले!

राजस्थान आणि अन्य राज्य सरकारमध्ये ओळखी असून पेट्रोलपंपासह ई- टॉयलेटच्या कंत्राटी मोठी कामे असल्याच्या बहाण्याने अहमदाबाद येथील संशयितांनी नाशिकच्या एकाला सुमारे ६.८० कोटींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार विविध चौदा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये सचिनभाई पुरुषोत्तमभाई वेलेरा (भावकुंज सोसायटी, जोधपूर अहमदाबाद), वैभव गेहलोत (दडो, सरदारपुरा जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, प्रवीण सिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाना, निरवभाई महेशभाई विर्माभट, विस्वरंजन मोहंती, राजबिरसिंग शेखावत, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसई, सावनकुमार पारनेर, रिशिता शाह, विराज पांचाल अशी संशयितांची नावे आहेत. संशयित हे अहमदाबाद राजस्थान भागातील आहे. १ जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२० दरम्यान संशयितांनी हा गंडविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी गंगापूर रोड येथील सुशील भालचंद्र पाटील (३३, ओंकार बंगला, गंगापूर रोड) यांच्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार पाटील यांची संशयितासोबत गुजरात येथील एका कार्यक्रमात भेट झाली. त्या दरम्यान संशयितांनी त्यांना राजस्थान पंजाब अशा एचपी पेट्रोलपंप ई- टॉयलेटची कंत्राट देण्याची कामे असल्याचे सांगितले. त्यात आरटीजीएस, रोख, धनादेशाने पैसे दिले. मात्र कुठलेही कामे न मिळाल्याने संशयितांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी कुणी फसविले गेले असल्यास गंगापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com