नाशिकच्या मतदारयादीतून ८० हजार नावे वगळली

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्रांसह मतदार यादीचे पुनरिक्षण करण्यात आले.
Suraj Mandhre
Suraj MandhreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार (Instructions) छायाचित्रांसह मतदार यादीचे (Voting List) पुनरिक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीचे शुद्धीकरण (Abstersion) राबविण्यात आले. या अनुषंगाने २०९१ ते २०२१ या कालावधीतील ८० हजार ६०५ दुबार मतदारांची (Voters) नावे वगळण्यात (Delition) ली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhre) यांनी दिली.

Suraj Mandhre
आदिवासींना घरे नकोत का?. त्यामुळे यापुढे पाडा तिथे ‘म्हाडा’

मागील तीन वर्षातील विशेष संक्षिप्त कार्यक्रम अंतर्गत १६,७०४ मयत, ४८ हजार ०२४ स्थलांतरीत व १५ हजार ८७७ दुबार अशी ८० हजार ६०५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

मतदारयादी शुद्धीकरण कार्यक्रमास प्राधान्य देवून जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना दुबार मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत तात्काळ पडताळणी व वैधानिक प्रक्रियेचे पालन करुन दुबार नावे वगळण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मतदारयादी शुद्धीकरणाचे कामकाज मुदतीत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार मतदार नोंदणी शोधमोहिम अंतर्गत नोटीस निर्गमित करणेकामी तसेच इतर आवश्यक कामकाजासाठी अतिरीक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही श्री. मांढरे यांनी सांगितले.

Suraj Mandhre
मालेगावच्या विकासासाठी हवा तेव्हढा निधी देऊ!

सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मतदार यादीतील नाव दुबार नोंदविले जाणार नाही यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती दक्षता घेण्याबाबत सर्व आस्थापनांना कळविण्यात आले आहे. याकरीता अधिनस्त कर्मचारी यांचे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन त्याबाबतचे विभाग प्रमुख तसेच विविध संस्था प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणेबाबतही निर्देशीत करणेत आले आहे.

समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

विभाग, संस्था प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांची समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व औद्योगिक संस्था व आस्थापनांसाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, सर्व प्रकारच्या बांधकाम संबंधित आस्थापना व संस्थासाठी कामगार सहायक आयुक्त आणि इतर मोठ्या आस्थापनांसाठी लघु पाटबंधारे भुसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची समन्वयिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मतदारयादीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांची नावे होती. वारंवार आवाहन करूनही अनेक दुबार नावे देखील आढळली. त्यानुसार २०१९ मध्ये १५,०१८, २०२० मध्ये ८,५०९, २०२१ मध्ये ५६ हजार नावे वगळण्यात आली आहेत. यासंदर्भात राजकीय पक्षांकडून ही नावे वगळण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात आली होती. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नावे वगळल्याने काही प्रस्थापितांना तो धक्का मानला जात आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com