Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांची मोठी घोषणा; आता एक हजार रुपयांत घरपोच वाळू
BJP News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल सरकारच्या प्रति कृतज्ञता सोहळा आज पार पडला.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ''महसूल खात्याच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय करत आहोत. आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळूची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. आता सर्व ठिकाणची वाळू सरकार स्वत: काढणार आहे'', असं ते म्हणाले.
''वाळूचे डेपो लावून ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून तुम्हाला थेट घरपोहोच वाळू सरकार देणार आहे. वाळूचे डेपो लावले तेथे वाळू घेतली तर तुम्हाला ६०० रुपयांमध्ये मिळेल. जर घरपोहच घेतली तर एक हजार किंवा १५०० रुपयांत मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा विधानसभेत लवकरच करणार आहे'', असंही विखे पाटील यांनी सांगितलं.
''या निर्णयावर चर्चा सुरू असून यामुळे गरिबांना घरासाठी वाळू मिळेल, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आजची परिस्थिती पाहिली तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. वाढलेली गुन्हेगारी संपावायची असेल तर आपल्याला हे करावे लागेल'', असंही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.