Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगरमध्ये प्रचाराआधीच कोट्यवधींचा चुराडा

Ahmednagar Politics News : नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसह 84 पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसह 84 पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य पदासाठी 4 हजार 265 आणि सरपंच पदासाठी 711 विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींमधील 1 हजार 701 सदस्य पदांच्या जागांसाठी 7 हजार 260, तर 194 सरपंच पदांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नगर जिल्ह्यातील 73 जागांवर ग्रामपंचायतींत पोट निवडणुका होत आहेत. यासाठी 81 जणांनी सदस्य पदासाठी, तर एका सरपंच पदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर नगर जिल्ह्यात तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

Gram Panchayat Election News
Raj Thackeray Speech : 'माझ्याकडे जेव्हा कधी सत्ता येईल तेव्हा पहिलं काम..' ; राज मनातलं बोलले!

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) सोमवारपासून ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सर्व्हर डाउन असल्याने अर्ज ऑनलाइन भरूनदेखील तो सबमिट होत नव्हता. त्यामुळे उमेदवारांचा संताप होत होता. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आणि उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याच्या वेळेत वाढ केली. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नगर जिल्ह्यात सेतूसारख्या केंद्रावर (सायबर कॅफे) उमेदवारांची आठवडाभर गर्दी होती. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रतिअर्ज अठराशे, तर दोन हजार रुपये आकारले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींमध्ये 1 जार 701 सदस्य पदांसाठी 7 हजार 260 अर्ज दाखल झाले आहेत. प्रतिअर्ज अठराशे रुपयांनी धरल्यास त्यातून 1 कोटी 30 लाख 68 हजार रुपयांची उलाढाल झाली. सरपंचपदासाठी 1 हजार 311 अर्ज दाखल झाले आहेत. अठराशे रुपये प्रतिअर्ज धरल्यास यावर 23 लाख 59 हजार 800 रुपयांची उलाढाल झाली.

निवडणुकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. एक अर्ज भरण्यासाठी एक ते दीड तास जातो. उमेदवाराचा प्रत्येक कागद स्कॅन करावा लागतो. तो अर्जासोबत साइजमध्येच भरावा लागतो. यात इंटरनेटचा वेग कमी झाल्यास अनेक अडथळे येतात. काही आयोगाची साइटचा वेग कमी होतो, तर काही वेळा साइटचे सर्व्हर बंद असायचे. असे अडथळे आले की, यातून अर्ज पहिल्यापासून भरावा लागतो. कामात वेगापेक्षा अडथळे अधिक असतात. पहाटे सहा वाजता उठूनदेखील अर्ज भरण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व्हर बंद असल्याने अर्ज अपलोड झालेले नाहीत. अर्ज भरला गेला नाही. यात मानसिक त्रासच जास्त आहे. त्यामुळे आकारलेले दर योग्यच असल्याचा दावा एका सायबर कॅफे चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुका, त्यासाठी सदस्य आणि सरपंचपदासाठी दाखल अर्ज

अकोले 27 ग्रामपंचायत : 365 (221)

संगमनेर (Sangamner) सात ग्रामपंचायत : 279 (40)

कोपरगाव 17 ग्रामपंचायत : 650 (90)

श्रीरामपूर 17 ग्रामपंचायत : 661 (89)

राहाता 12 ग्रामपंचायत : 635 (141)

राहुरी 22 ग्रामपंचायत : 912 (162)

नेवासे 16 ग्रामपंचायत : 582 (504)

नगर तालुका आठ ग्रामपंचायत : 390 (47)

पारनेर सात ग्रामपंचायत : 295 (52)

पाथर्डी 15 ग्रामपंचायत : 460 (112)

शेवगाव 27 ग्रामपंचायत : 1, 032 ( 174)

कर्जत सहा ग्रामपंचायत : 227 (48)

जामखेड तीन ग्रामपंचायत : 128 (24)

श्रीगोंदे 10 ग्रामपंचायत : 644 (107)

नेवासे, अकोल्यात सरपंच पदासाठी विक्रमी अर्ज

अकोले, राहाता, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदे तालुक्यात सरपंच पदासाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. गावातील जनतेतून सरपंच निवडून दिला जाणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी चुरस असणार आहे. नेवासे तालुक्यात 16 ग्रामपंचायतींसाठी 504 जणांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहे. त्याखालोखाल अकोले (Akole) तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 221 जणांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Gram Panchayat Election News
Supriya Sule criticizes Fadnavis : माफीनाम्याचा ढोंगीपणा बंद करा, काँग्रेस-राष्ट्रवादीने कधीच कंत्राटी पदे भरली नव्हती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com