Ahmednagar News : कर्नाटकात निवडणूक राजकारण नगरमध्ये तापलं; थेट काँग्रेस कार्यालयाला पोलीस बंदोबस्त

Congress News : अहमदनगरमधील काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Ahmednagar Congress
Ahmednagar CongressSarkarnama

Ahmednagar News : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप-काँग्रेसकडून या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने एक घोषणापत्र जारी केले होते. यामध्ये कर्नाटकात जर काँग्रेसचे सरकार आले तर 'बजरंग दल'वर बंदी घालण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.

प्रचारादरम्यान काँग्रेसने 'बजरंग दला'वरही जोरदार टीका केली होती. यानंतर भाजपने आणि 'बजरंग दला'ने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये तणावाचे वातावर निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच अहमदनगरमधील काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ahmednagar Congress
Samruddhi news : `समृद्धी` महामार्गावरील अपघात रोखण्यास सापडला `हा` उपाय!

कर्नाटकमध्ये तणावाचे वातावर निर्माण झाल्याने भाजप प्रणित संघटनांच्यावतीने गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली पोलिसांनी शहर काँग्रेसच्या चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

Ahmednagar Congress
Sharad Pawar On Ajitdada :अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकले.....

दरम्यान, अहमदनगर शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी काँग्रेस कार्यालयास भेट देऊन समक्ष पाहणी केली आहे. दरम्यान, कुणी आमच्या अंगावर आल्यास त्यांना शिंगावर घेऊ, असा इशारा युवक काँग्रेसच्यावतीने दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com