Ram Shinde And Nilesh Ghaiwal : भाजपचा उच्चशिक्षित आमदार आणि कुख्यात गुंड घायवळ एकत्र; विधानसभेच्या तोंडावर राम शिंदेंची 'ही' कृती चर्चेत

MLA Ram Shinde together with Pune gangster Nilesh Ghaiwal in Jamkhed : भाजपमधील उच्चशिक्षित आमदार प्रा. राम शिंदे पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासोबत जामखेडमधील नागेश्वराच्या यात्रेला एकत्रित हजेरी लावली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ram Shinde And Nilesh Ghaiwal
Ram Shinde And Nilesh GhaiwalSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : 'बॉस' नावाने पुणे शहरातील गल्लो-गल्लीत दबदबा असलेला कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळ सोबत भाजपमधील उच्चशिक्षित आमदार प्रा. राम शिंदे एकत्रित दिसले आहे. जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेनिमित्ताने हे दोघं एकत्र होते. तसा दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारीत 'कुख्यात' म्हणून ओळखला जाणारा नीलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघे जामखेडमध्ये यात्रेनिमित्त एकत्र आल्याने, उच्चशिक्षित राम शिंदे यांच्या या कृतीची वेगळीच चर्चा होऊ लागली आहे.

नीलेश घायवळ याच्यावर पुणे (PUNE) शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना चार फेब्रुवारीला शुभेच्छा देण्यासाठी वर्षा बंगल्यावर देखील नीलेश घायवळ होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी फोटो ट्विट करत, मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली होती. पुण्यातील गुंडांना मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्रांचा राजकीय वरदहस्त मिळतो का? असा सवाल केला होता. आता नीलेश घायवळ आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे यात्रोत एकत्र फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा आणि सत्तेच्या मार्गाच्या चाव्या यंदा गुन्हेगारांकडे आहे की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

Ram Shinde And Nilesh Ghaiwal
Monica Rajale Vs Chandrashekhar Ghule : 10 वर्ष घराबाहेर नसलेल्यांना गावं ओळखू येईना; आमदार राजळेंनी घुलेंवर साधला निशाणा

जामखेडमधील आमदार प्रा. राम शिंदे भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ, असे म्हणून राम शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपमध्ये त्यांचा वेगळा दबदबा असून, आता राम शिंदे राजकारणात स्थिरावलेत. एम.एस्सी. बीएड शिक्षण झालेले राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि.बीड) येथे नोकरी देखील केली आहे. तेव्हापासून त्यांच्या नावापुढे प्राध्यापक लागले आहे. यानंतर जामखेडमधून 1997 मध्ये राजकीय प्रवासाला सुरवात केली. चौंडी ग्रामपंचायतीत 2000 मध्ये एकहाती सत्ता आणत पाच वर्षे सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू झाला.

Ram Shinde And Nilesh Ghaiwal
Prajakt Tanpure Vs Shivaji Kardile : ते सरकारचे जावई आहेत का? आमदार तनपुरेंची कर्डिलेंवर बोचरी टीका

उच्चशिक्षित राम शिंदेंची ही कृती का?

प्रा. राम शिंदे यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत विरोधकच जास्त वाट्याला आलेत. 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेचा दार खुले झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघावर पकड मजबूत करताना अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्ष, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अशा जबाबदाऱ्या संभाळल्या. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. राज्य आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होते. नगर जिल्ह्याचे पाच वर्ष पालकमंत्री म्हणून काम केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधान परिषदेवर संधी मिळाली.

राम शिंदे यांना पुन्हा विधानसभेचे वेध लागलेत. त्यासाठी ते प्रयत्नशील दिसतात. पक्ष काय निर्णय घेतो, यावर निवडणूक लढवू,असे त्यांच्याकडून संकेत मिळत आहेत. यासाठी त्यांनी कर्जत-जामखेडमध्ये संपर्कांवर भर दिलाय. यातच त्यांचा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळ याच्याबरोबर जामखेडमध्ये एकत्र फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.

घायवळ आणि मारणे टोळीचा रक्तरंजक प्रवास

'बॉस' नावाने कुख्यात गुंड नीलेश घायवळ ओळखले जात असून त्याचे मास्टर इन कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले आहे. गजानन मारणेची भेट झाल्यानंतर गुन्हेगारीकडे वळला. दोघांनी मिळून एका गुन्हेगाराच खून केला. त्यात त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली. पुढे दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाचा वाद सुरू झाला. यामध्ये घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला. तर याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडले याचा खून केला. पुढे रक्तरंजक थरार वाढतच गेला. नीलेश घायवळ याच्यावर पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com