ACB department news : घर बांधण्याच्या परवानगीसाठी गेले सहा महिने चकरा मारूनही अडवणूक केली जात होती. आराखडा मंजूर करण्यासाठी लाच मागीतली जात होती. या प्रकरणात मुख्याधिकाऱ्याला अटक करण्यात आली. सिन्नर शहरात सलग दुसऱ्या दिवशी लाचखोरांविरोधात कारवाई झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (Nashik ACB taken action against Sinnar municiple officer)
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून घर बांधण्याचा आराखडा मंजुरीसाठी नगरपालिकेत सादर करण्यात आला होता. त्याला दोन आठवड्यात मंजुरी अपेक्षीत होती. मात्र तसे झाले नाही.
याबाबत मुख्याधिकारी केदार हे जाणीवपूर्वक अनेक महिन्यांपासून टाळाटाळ करीत होते. तक्रारदारांना चकरा मारायला लावत होते. अखेरीस त्यांनी लाचेची मागणी केली. त्यात तडजोडीत पाच हजाराची लाच देण्याचे ठरले. ही लाच देताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले.
नगरपरिषदेचे मावळते मुख्याधिकारी संजय केदार यांना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले. तक्रारदाराची बांधकाम मंजुरीची फाईल ६ महिन्यांपासून अडवून ठेवली होती. त्या पोटी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात तीन-चार दिवसांपासून मोबाईलवर सुरू असलेले संभाषण पुरावा म्हणून ग्राह्य धरत केदार यांना दुपारी साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या शिवाजीनगर मधील त्यांच्या निवासस्थानाचीही तपासणी करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.