ACB News; लाचखोर महिला तलाठी पोलिसांच्या जाळ्यात अडकली

लाच स्विकारण्यात महसुल विभागाची आगेकुच सुरुच असल्याचे सध्याचे चित्र आहे.
ACB action against Bribe
ACB action against BribeSarkarnama

भुसावळ : तालुक्यातील खडका हद्दीमधील नवीन खरेदी केलेल्या प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच (ACB) स्वीकारणाऱ्या तलाठी मनीषा गायकवाड (Manisha Gaikwad) यांना जळगावच्या (Jalgaon) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. (ACB arrest women revenue employee while taking bribe)

ACB action against Bribe
BJP news; हळदी-कुंकू कार्यक्रमात झाला विधवांचा सन्मान

खडका व साकरी सजामधील तलाठी मनीषा नीलेश गायकवाड (वय ३८, रा. मोरेश्वरनगर, भुसावळ) यांनी तक्रारदाराकडून खडका हद्दीमधील नवीन खरेदी केलेल्या प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागितली. मंगळवारी तीनशे रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली.

ACB action against Bribe
Varkari Community News: बागेश्वर बाबा हा तर अज्ञानी बाबा!

उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एस. जाधव, पोलिस कर्मचारी शैला धनगर, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांनी सापळा रचून पकडले. तलाठी मनीषा गायकवाड यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, सचिन चाटे, प्रणेस ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.

धुळ्यात डेटा ऑपरेटर ताब्यात

प्रधानमंत्री किसान योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या पडताळणीकामी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर कंत्राटी डेटा ऑपरेटरला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळे तालुका कृषी कार्यालयात ही कारवाई केली. सुनील रामदास सूर्यवंशी असे लाचखोर कंत्राटी डेटा ऑपरेटरचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारदार नाशिक येथे वास्तव्यास आहेत. त्यांची पुरमेपाडा (ता. धुळे) येथे वडीलोपार्जित शेतजमीन आहे. शेतीचा तक्रारदाराच्या मातोश्रींना प्रधानमंत्री (पीएम) किसान योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, त्यांच्या आईचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यामुळे योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यामुळे तकारदार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतीवर पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीचे काम तलाठीकडून कृषी खात्याकडे देण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांना धुळे तालुका कृषि कार्यालयातील कंत्राटी डेटा ऑपरेटर सुनील सूर्यवंशी याने तकारदार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी भरलेल्या पीएम किसान योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या पडताळणीसाठी कागदपत्रे देण्यास सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com