ACB Squad in Nashik Court: लाचखोर सहाय्यक निबंधकांच्या मालमत्तेची चौकशी होणार!

ACB News: वीस लाखांची लाच स्विकारणाऱ्या सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकांच्या घरातून दिड लाख जप्त
ACB Squad in Nashik Court
ACB Squad in Nashik CourtSarkarnama

Nashik News: सिन्नर (Sinner) तालुक्यातील एकाविरोधात सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी २० लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तालुका सहाय्यक निबंधकासह (Asistant Regisrtar) दोघांना अटक झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आता त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती करणार आहे. सहकार विभागातील (Co-operative) एका अधिकाऱ्यांला गेल्या आठवड्यातच अटक झाली होती. (ACB caught Cooperative A.R. In Nashik)

ACB Squad in Nashik Court
Pimpalgaon APMC News; आमदार दिलीप बनकर यांना अनिल कदम यांचा दे धक्का!

या प्रकरणी रणजित महादेव पाटील (वय ३२, रा. नाशिक, मूळ रा. सांगली), वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण (४५) असे लाच मागणी करणाऱ्यांचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना शनिवार (ता. १) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ACB Squad in Nashik Court
Ajit Pawar News: माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदाला अजित पवारांचा खो!

दरम्यान, लाचखोर पाटील याच्या घरातून दीड लाखाची रोकड जप्त करण्यात आली असून, ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सिन्नर येथील ३९ वर्षीय तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांच्या आजोबांवर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सिन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील याने २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. बुधवारी रात्री मुंबई नाका येथे पाटील याने तक्रारदारास लाचेची रक्कम घेऊन बोलविले होते. दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना रोखत लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. बुधवारी रात्री उशिरा मुंबई नाका पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ACB Squad in Nashik Court
Ajit Pawar : कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालणार!

गुरुवारी (ता. ३०) दुपारी दोघा लाचखोरांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत पाटील याच्या मालमत्तेची तपासणी केली जाणार आहे. ही कारवाई विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने केली.

ACB Squad in Nashik Court
Pimpalgaon APMC News; आमदार दिलीप बनकर यांना अनिल कदम यांचा दे धक्का!

महिन्यात दुसरा अधिकारी सापळ्यात

लाचखोर रणजित पाटील हा सहकार विभागात २०१४ मध्ये रुजू झाला. सध्या पाटील याच्याकडे जिल्ह्यातील निफाड तालुका सहाय्यक निबंधकपदाची जबाबदारी होती. दरम्यान, गेल्या २ मार्चला सिन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील (५७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यामुळे पाटील याच्याकडे सिन्नरचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र महिन्याच्या आतच पाटीलही तब्बल २० लाखांच्या लाचप्रकरणात रंगेहाथ अटक झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com