Traffic Politics : मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच, नाशिक- मुंबई वाहतूक कोंडी कायम!

After CM Eknath Shinde`s meeting Nashik-Mumbai traffic issue continue-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन केलेल्या सूचना आंमलात येईना, कोंडीने नागरिक त्रस्त.
CM Eknath Shinde visits Thane bypass Road.
CM Eknath Shinde visits Thane bypass Road.Sarkarnama
Published on
Updated on

Traffic Issue : नाशिक -मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बैठक घेतली होती. त्यात विविध सूचना केल्या होत्या. मात्र या सुचनांनतरही कोंडी कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. (CM Eknath Shinde have taken special meeting to resolve Traffic issue)

नाशिक (Nashik) मुंबई (Mumbai) महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बैठक घेतली होती. त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निर्माण करण्यात आले होते. मात्र त्याचे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत.

CM Eknath Shinde visits Thane bypass Road.
Deepak Kesarkar On Bhide : `भिडेंचं वक्तव्य हा त्यांच्या वयोमानाचा परिणाम असावा`

नाशिक-मुंबई वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र बनला आहे. मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. कल्याण फाटा, भिवंडी नाका या भागात समृद्धी महामार्ग महामार्गाचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्याबाबत तीव्र नाराजी होती. त्याचे पडसाद विधीमंडळात देखील उमटले होते.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधीमंडळ कार्यालयात बैठक झाली होती. त्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय सुचविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामध्ये या मार्गावर अवजड वाहतूकीसाठी वेळ निश्चित केला जाईल. तोपर्यंत ही वाहने नाशिकच्या सीमेवर व भिवंडी येथे जागा घेऊन उभारलेल्या वाहनतळावर पार्क केली जातील. हा प्रमुख निर्णय होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत विभागांची टास्क फोर्स तयार केली होती.

CM Eknath Shinde visits Thane bypass Road.
Schools Safety : शाळांच्या इमारतीकडे सरकार केव्हा लक्ष देणार?

या बैठकीचा काहीही परिणाम झालेले दिसून आलेला नाही. वाहतूक कोंडी कायम आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने शुक्रवारी व शनिवारी त्याची झळ प्रामुख्या राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांना बसली. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठाणे बायापस दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली होती. बैठक घेतली, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले, ते देखील राज्याचे प्रमुख तरीही वाहतूक कोंडी सुटेना अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com