Deepak Kesarkar On Bhide : `भिडेंचं वक्तव्य हा त्यांच्या वयोमानाचा परिणाम असावा`

Sambhaji Bhide`s statements may coming due to his oldage- शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, संभाजी भिडेंच्या वक्तव्याने सबंध समाजाला दुःख झाले आहे.
Deepak Kesarkar & Sambhaji Bhide
Deepak Kesarkar & Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : संभाजी भिडे मला भेटल्यास मी त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांना सांगेन की आपले जे काम सुरू आहे, तेच चागंल्या प्रकारे करीत रहावे, अनावश्यक वक्तव्ये करण्याचे टाळावे. (Education Minister Deepak Kesarkar disagree with Sambhaji Bhide)

राज्याचे (Maharashtra) शालेय शिक्षण मंत्री (Education) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी असहमती व्यक्त केली.

Deepak Kesarkar & Sambhaji Bhide
Schools Safety : शाळांच्या इमारतीकडे सरकार केव्हा लक्ष देणार?

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची विभागीय बैठक आज येथे झाली. यावेळी त्यांनी शिवस्वराज्य संघटनेचे भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आपली प्रतिक्रीया दिली.

ते म्हणाले, संभाजी भिडे जी भाष्ये करतात, तो सर्व वयोमानाचा परिणाम असावा. आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा विचार करताना हा मुद्दा देखील विचार करावा. वयोमानाचा मुद्दा हा देखील विचारात घेतलाच पाहिजे. श्री. भिडे गड, किल्ल्यांबाबत काम करतात. त्यांनी त्या क्षेत्रात काम करीत रहावे. अनावश्यक वाद होईल अशी विधाने टाळली पाहिजेत. माझी आणि त्यांची भेट झाल्यास मी त्यांना जरूर त्याविषयी सांगेन.

Deepak Kesarkar & Sambhaji Bhide
Kunal Patil on Sambhaji Bhide : राज्य सरकार संभाजी भिडेंना का पाठीशी घालते आहे?

काय आहे प्रकरण...

शिवस्वराज्य संघटनेचे संभाजी भिडे यांनी अमरावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. याविषयी विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह विविध सदस्यांनी लक्ष वेधले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com