Amit Bhangare : पिचड पिता-पुत्रांची भेट खटकली; अमित भांगरे 'अलर्ट मोड'वर, पोचले शरद पवारांच्या भेटीला...

Amit Bhangare met Sharad Pawar : ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अकोलेमधून इच्छुक असलेले अमित भांगरे सावध झाले आहेत.
Amit Bhangare
Amit BhangareSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा नगर जिल्ह्यात येऊन गेल्यापासून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, कर्जत इथं शरद पवार यांच्या व्यासपीठावर भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांचं एकत्र येणं, लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला नगर जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवार यांची 'पक्कड' मजबूत झाल्याचं दिसतं आहे.

यात अकोले विधानसभा मतदारसंघातील राजकारण वेगळ्याच उत्कंठेवर पोचलं आहे. पिचड पिता-पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेताच 'NCP' शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे अलर्ट झाले असून, ते देखील भेटीला पोचले.

अमित भांगरे आपल्या आईसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपशील अमित भांगरे यांनी सांगितला नसला, तरी अकोले विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारीत असल्याचा इशारा दिला. भाजपमध्ये (BJP) असलेले पिचड पिता-पुत्रांच्या भेटीनंतर भांगरे माय-लेकांनं शरद पवारांची भेट घेतल्यानं अकोलेमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवार यांची भेट झाल्यानंतर अमित भांगरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. तत्पूर्वी शरद पवारांचे (Sharad Pawar) आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. अमित भांगरे म्हणाले, "अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. इथं गद्दारांना थारा नसतो. आमदारानी गद्दारी केली, त्यामुळे जनता त्यांना थारा देणार नाहीत. शरद पवारसाहेबांच्या पाठीत आमदार किरण लहामटे यांनी खंजीर खुपसला आहे". पुढील काळामध्ये जनता अकोला मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून पवारसाहेबांनी जुलैमध्येच आशीर्वाद दिला असल्याचेही अमित भांगरे यांनी म्हटलं.

पिचडांची कोंडी

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्याबरोबर असलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी पवारांची साथ सोडत 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद दाखवत वैभव पिचड यांचा पराभव केला. किरण लहामटे विजयी झाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर किरण लहामटे यांनी अजितदादाबरोबर जाणे पसंत केले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती भाजपबरोबर सत्तेत सहभागी आहे. महायुतीत अकोलेची जागा अजित पवारांचा विद्यमान आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाते. यामुळे भाजपमध्ये असलेले पिचड पिता-पुत्रांची राजकीय कोंडी झाली आहे.

अमित भांगरे 'अलर्ट'

तत्पूर्वीच अमित भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून अकोले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली आहे. या सर्व राजकीय घडामोडी पिचड पिता-पुत्रांची राजकीय कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पिचडांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जाते. परंतु या भेटीमुळे अमित भांगरे अलर्ट झाले असून, त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर अजितदादांच्या आमदारांविरोधात राजकीय लढाईसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com