Manikrao Kokate Politics: काँग्रेसचे स्पष्टीकरण, कृषिमंत्री कोकाटे यांचे स्वागत केलेच नाही, कोकाटे यांनीच केला आमचा सत्कार अन् दिल्या शुभेच्छा!

Congress Clarifies We Didn't Welcome Agri Minister Kokate, He Honored Us: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा चांदवड येथे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देऊन स्वागत केल्याची चर्चा होती.
Manikrao Kokate & Shirish Kotwal
Manikrao Kokate & Shirish KotwalSarkarnama
Published on
Updated on

Congress Denies Welcoming Kokate Claims Felicitation: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. रमी खेळण्याच्या वादामुळे ते अडचणीत आले आहेत. अशातच चांदवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे स्वागत करीत पाठिंबा दिल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गुरुवारी धुळ्याच्या दौऱ्यावर होते. धुळे येथे जाताना रस्त्यात चांदवड येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे स्वागत केले. कोकाटे यांना आपल्या पाठिंबा देत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी केल्याच्या ही बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

कृषिमंत्री कोकाटे यांच्या विषयीच्या या बातम्यांमुळे एकच खळबळ उडाली होती. यांच्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी नेते विधिमंडळात काँग्रेस पक्ष कृषिमंत्री कोकाटे आणि महायुती सरकार यांच्या विरोधात रान पेटवत आहे. असे असताना स्थानिक काँग्रेस मात्र कोकाटे यांना पाठिंबा देत असल्याचा विरोधाभासी राजकारण चर्चेत होते.

Manikrao Kokate & Shirish Kotwal
Prahar Sanghatana Protest: देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले, त्याच ठिकाणी 'प्रहार'ने केला तीन तास चक्का जाम!

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी मात्र तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. श्री कोतवाल म्हणाले, आम्ही कोकाटे यांचा सत्कार केलेला नाही. उलट कृषिमंत्री कोकाटे यांनीच माझा सत्कार केला आहे. याबाबत प्रसारित झालेले वृत्त चुकीचे आहे.

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असलेले माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी प्रतिक्रीया दिली. गुरुवारी माझा वाढदिवस होता. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी मला फोन करून कुठे आहात? असे विचारले होते. मी शेतात काम करत होतो.

स्वीय सहाय्यकांनी कृषिमंत्री धुळ्याला जात आहेत. आपण जवळच महामार्गावर याल का? असे विचारले. मंत्र्यांनी आणि जुने स्नेही म्हणून बोलावल्याने मी तेथे गेलो होतो. यावेळी माझा वाढदिवस असल्याने कृषिमंत्री कोकाटे यांनी माझा सत्कार केला.

काही वाहिन्यांवर काँग्रेस पक्षांने कृषिमंत्री कोकाटे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याला आमचा विरोध असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. या वृत्ताशी आमचा काहीही संबंध नाही. श्री कोकाटे यांचा विषय हा राज्यस्तरीय असून आम्ही त्यावर आमच्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम आहोत.

काही वाहिन्यांवर चांदवड येथे कृषिमंत्री कोकाटे यांचे स्वागत काँग्रेसने केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी कोकाटे यांना आमचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. मंत्री कोकाटे यांच्या समर्थनासाठी आम्ही आत्मदहन देखील करू शकतो असे प्रसाद देशमुख या लोहनेर येथील कार्यकर्त्यांने म्हटले होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com