
Farmers issues Maharashtra : किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या सुरू असलेल्या दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
दौऱ्यात मंत्र्यांची सुरू असलेल्या नौटंकीवर हल्ला चढवला. 'ट्रॅक्टरवर चढणे, होड्यांमध्ये फिरणे, पाण्यात उतरणे, यापेक्षा मंत्र्यांनी मंत्रालयात बसून, निर्णय घ्यावा,' अशी मागणी डॉ.अजित नवले यांनी केली.
डॉ. अजित नवले म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी दौऱ्यावर आहेत. याचबरोबर मंत्रिमंडळातील इतर खात्यातील मंत्रीही अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत फिरत आहेत." या दौऱ्यात कोणी ट्रॅक्टरच्या टफावर चढत आहेत तर, कोणी होड्यातून भरताना फोटो काढताना दिसत आहेत तर, कोणी पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांच्या दुःखाची पाहणी करत आहे. पण ही सर्व नौटंकी आहे, असे डॉ. अजित नवले यांनी म्हटले.
'हे सर्व करण्यापेक्षा मंत्रालयात बसून 30 मे 2025 चा जो आदेश आहे, तो जर बदलला, शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाले. या आदेशानुसार एक हेक्टर कोरडवाहू जमीन खराब झाली तर, त्यात 8 हजार 500 रुपये नुकसान भरपाई पोटी देणार, असे सांगितले आहे. यात एक एकर जमिनीची नांगरणी सुद्धा होत नाही. बागायती जमीन खराब झाल्यास, प्रति हेक्टरी केवळ 17 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या लाख-सव्वा लाख रुपयांच्या गाई-म्हशी वाहून गेल्याकडे,' डॉ. अजित नवले यांनी लक्ष वेधले.
डॉ. अजित नवले यांनी, सरकार आदेशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी केवळ 37 हजार 500 रुपये मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची कोणतेच नुकसान भरून येणार नाही. त्यामुळे नौटंकी करून काहीच होणार नाही. पाण्यात, होड्यांवर फोटो काढून समाज माध्यमांवर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसून सरकारी आदेश बदला, निकष पिक विम्याचे जे तुम्ही काढून टाकले आहेत, त्यावर काम करा, अशी मागणी केली.
'अतिवृष्टीमुळे राज्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सरकारी आदेशाच्या पलीकडे जात एका एकरला शेतकऱ्याला 50 हजार रुपये कसे देता येतील, हे बघावे. तसेच शेतमजुराच्या श्रमाचे नुकसान झालेले आहे, त्याचे जगणे मुश्किल झालेले आहे त्याला तातडीची 25 हजार रुपयांची मदत देण्यासाठी सरकारी आदेश काढा. परंतु अतिवृष्टी सुरू असलेली मंत्र्यांची नौटंकी थांबवा आणि ठोस मदत करा,' असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.